महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

यास चक्रीवादळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

पंतप्रधान ओडिशाच्या बालासोर, भद्रक आणि पश्चिम बंगालच्या पूर्वी मिदनापुर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान, त्यांच्यासोबत बैठकीत सहभागी होतील. ही बैठक पश्चिमी मिदनापुर जिल्ह्याच्या कलाईकुंडा येथे ही बैठक होणार आहे.

pm-modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : May 28, 2021, 9:15 AM IST

कोलकाता/भूवनेश्वर :यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा दौरा करणार आहेत. दौऱ्यावेळी ते दोन्ही राज्यांत होणाऱ्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. माहितीनुसार, ते आधी भुवनेश्वरला पोहोचणार आहेत.

पंतप्रधान ओडिशाच्या बालासोर, भद्रक आणि पश्चिम बंगालच्या पूर्वी मिदनापुर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान, त्यांच्यासोबत बैठकीत सहभागी होतील. ही बैठक पश्चिमी मिदनापुर जिल्ह्याच्या कलाईकुंडा येथे ही बैठक होणार आहे.

हेही वाचा -'सकारात्मकता हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी मोदींनी केलेला PR स्टंट'

दरम्यान, मुख्यमंत्री बनर्जी या मुख्य सचिव अलपन बंदोपाध्याय यांच्यासोबत आज (शुक्रवार) यास चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या पूर्वी मिदनापुर, उत्तर और दक्षिण 24 परगना जिल्ह्याचा हवाई सर्वेक्षणाद्वारे आढावा घेणार आहेत. तर आतापर्यंत ओडिशा राज्यात चक्रीवादळामुळे तीन जणांचा तर पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे. या वादळाचा कमीत कमी एक कोटी जणांना फटका बसला आहे, असा दावा पश्चिम बंगाल सरकारने केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details