महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pm Modi to Meet Elon Musk : पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार एलन मस्कची भेट, अमेरिका दौऱ्यात 'या' उद्योगपतींनाही भेटणार - एलन मस्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टेस्लाचे सहसंस्थापक एलन मस्क यांची भेट घेणार आहेत.

Pm Modi to Meet Elon Musk
संपादित छायाचित्र

By

Published : Jun 20, 2023, 4:36 PM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टेस्लाचे सहसंस्थापक एलन मस्क यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील आघाडीच्या 20 कंपनीच्या व्यावसाईकांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात नोबेल पारितोषिक विजेते, अर्थतज्ज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्वान, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, आरोग्य तज्ज्ञ आदींसह सुमारे २४ जणांना ते भेटणार आहेत.

या सुप्रसिद्ध व्यक्तींची पंतप्रधान मोदी घेणार भेट :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत आघाडीच्या कंपनीतील व्यावसायिकांच्या भेटी घेणार आहेत. यामध्ये टेस्लाचे सहसंस्थापक एलन मस्क, खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन, ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय अमेरिकन गायक फाल्गुनी शाह , पॉल रोमर, निकोलस नसिम तालेब, रे डॅलिओ, जेफ स्मिथ, मायकेल फ्रोहमन, डॅनियल रसेल, एल्ब्रिज कर्नल, डॉ. पीटर आग्रे, डॉ. स्टीफन क्लास्को आणि चंद्रिका टंडन यांच्या नावाचाही समावेश असल्याची माहिीत सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदी चार दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर :पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेला पोहोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 ते 24 जून या चार दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर ते रवाना झाले आहेत. या भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्यामुळे अमेरिकेसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. जग भौगोलिक-राजकीय अनिश्चिततेचा सामना करत असताना अत्यंत निर्णायक वेळी अमेरिकेच्या दौऱ्यावर आपण जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत 1 हजार 500 हून अधिक प्रवासी भारतीय आणि व्यावसायिक नेत्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

जेट इंजिन निर्मितीचा होणार करार :या भेटीदरम्यान जेट इंजिन निर्मितीचा संभाव्य करार होणार आहे. भारतीय हवाई क्षेत्रात हा करार परिवर्तनकारी ठरू शकणार असल्याचे बोलले जाते. जनरल इलेक्ट्रिक हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL) सोबत कोट्यवधी डॉलर्सच्या या करारामुळे GE-F414 जेट इंजिन भारतात तयार होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चेदरम्यान अमेरिकेसोबतच्या भारताच्या व्यापार संबंधांवरही चर्चा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. PM Modi USA Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर, जाणून घ्या कधी व कोणाची भेट घेणार
  2. PM Modi: चीनसोबत सामान्य द्विपक्षीय संबंधांसाठी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य आवश्यक- पंतप्रधान मोदी

ABOUT THE AUTHOR

...view details