महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तामिळनाडूत जंगी स्वागत ; 19 हजार 850 कोटींच्या प्रकल्पाची देणार नागरिकांना भेट

Pm Narendra Modi Tamil Nadu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली इथं भेट दिली. त्यांच्या हस्ते आज तामिळनाडूच्या जनतेला विविध प्रकल्पाची भेट देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित होते.

Pm Narendra Modi Tamil Nadu Visit
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना मुख्यमंत्री एम के स्टॅलिन

By ANI

Published : Jan 2, 2024, 12:41 PM IST

तिरुचिरापल्ली Pm Narendra Modi Tamil Nadu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी तिरुचिरापल्ली इथं विमानतळावर स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनस इमारतीचं उद्घाटन करणार आहेत. आज ते तिरिचिरापल्ली इथल्या भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले.

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीचं उद्घाटन :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन होणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपानं विजय संपादन केला. मात्र दक्षिणेत भाजपाला यश मिळालं नाही. विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच दक्षिणेतील दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासाठी भाजपाचे बॅनर रस्त्यावर झळकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळं तिरुचिरापल्ली शहरात तगडी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

1100 कोटी रुपयांचा खर्च :आज तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारत 1 हजार 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. ही नवीन आंतरराष्ट्रीय टर्मिनलची इमारत 44 लाखाहून अधिक प्रवाशांना सेवा देणार आहे. गर्दीच्या वेळेत एकाच वेळी 3 हजार 500 प्रवाशांना सेवा देण्याची या इमारतीची क्षमता असणार असल्याचंही पीएमओ कार्यालयानं दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

19 हजार 850 कोटींच्या प्रकल्पांची भेट :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू दौऱ्यात नागरिकांना तब्बल 19 हजार 850 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची भेट देणार आहेत. तिरुचिरापल्ली इथ भारतीदासन विद्यापीठात 38 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमान, वाहतूक, रेल्वे, रस्ते, तेल, जहाजबांधणी, आणि उच्च शिक्षणाशी संबंधित असलेल्या विविध प्रकल्पाची घोषणा करणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर करण्यात येणारे प्रकल्प तब्बल 19 हजार 850 कोटी रुपये किंमतीचे असल्याचं वृत्त वृत्तसंस्थेनं दिलं आहे. यात मदुराई ते तुतीकोरीन या 160 किमीच्या रस्त्याचं दुहेरीकरण, विद्युतीकरणाचे तीन रेल्वे प्रकल्प आदी प्रकल्पाचा समावेश असल्याचंही वृत्तसंस्थेच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदी 'ईस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर' देशाला करणार समर्पित; वाराणसीकरांना मिळणार दुसरी 'वंदे भारत'
  2. अयोध्येत विकासपर्व! मथुराचे लोक कलाकार करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत, हजारो कोटींच्या प्रकल्पांचं करणार लोकार्पण
  3. पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा; विमानतळासह 11 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं करणार उद्धाटन

ABOUT THE AUTHOR

...view details