पणजी- गोवा विधानसभा निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, की काँग्रेसमुळे गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास 15 वर्षे लागली आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामामुळे योजना 100 टक्के लाभार्थ्यांपर्यत पोहोचत असल्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले. योजना 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हीच खरी धर्मनिरपक्षेता असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण येत असल्याचे म्हटले. पंतप्रधान म्हटले, की जेव्हा कधी या सागरी किनारपट्टीवर येतो, तेव्हा प्रिय मित्र मनोहर पर्रीकर ( माजी संरक्षण मंत्री ) यांची आठवण येते. गोवेकरांना तर त्यांची उपस्थिती अधिक जाणवत असेल. गोवेकरांच्या प्रेमामुळे येथे उभा, हे माझे भाग्य आहे.
हेही वाचा-India Corona Update : गेल्या 24 तासांत 67 हजार नवे रुग्ण, तर मृत्यूसंख्येत वाढ कायम
मत देण्याचे आवाहन
लोकांनी कम्युनिस्टचा खेळ पाहिला, कुटुंब, व्यक्तीवाद आणि जातीवाद पक्ष पाहिले. भाजपचे कार्यकर्ते ही पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे. भाजपला दिलेले मत हे स्थिर आणि प्रगतीशील सरकारला दिलेले मत आहे. गोव्याच्या जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिलेले मत आहे. गोवा गोल्डन होईल, अशी ग्वाही दिली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन मोदींनी केले. तुमचे प्रयत्न वाया जाणार नाही, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे. भाजपवर विश्वास दाखवावा आणि 14 फेब्रुवारीला मौलिक मत द्या, असे त्यांनी आवाहन केले.
हेही वाचा-MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
जवाहरलाल नेहरु यांनी गोव्याच्या मुक्तीकरिता सैनिक पाठविण्यास नकार दिला होता
गोवा मुक्तीसंग्रामला उद्धवस्त करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास काँग्रेसमुळे उशीर झाला. काही तासांचे काम मात्र, त्याला 15 वर्षे लागले. गोव्यातील लोकांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागला. सत्याग्रह करावा लागला. त्यांनी मदत केली नाही. गोव्याच्या स्वातंत्र्यासांठी सैनिक पाठविणार नसल्याचे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लाल किल्ल्याच्या भाषणातून सांगितले. हे तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. ही काँग्रेस तुम्हाला मते मागत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
हेही वाचा-PM Modi Speech in Goa Election : गोव्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी 'या' 5 मुद्द्यांवर दिला भर
100 टक्के योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही खरी धर्मनिरपेक्षता
100 टक्के योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही खरी धर्मनिरपेक्षता आहे. गोव्यातील नागरिकांची राजकीय जाणीव अधिक आहे. मात्र, काँग्रेसला गोव्यातील तरुण आणि नागरिकांची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा समजू शकली नाही. त्यांनी गोव्याबाबत शत्रुत्वाची भावना ठेवली आहे. हे आजच्या पिढीने जाणायला हवे. ते इतिहासात लपून ठेवले आहे.
योजना 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हे भाजपच्या कार्यशैलीचे उदाहरण- पंतप्रधान