महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Narendra Modi On UCC : समान नागरी कायद्यावर मोदींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'एक देश-एक कायदा..' तीन तलाकचा इस्लामशी संबंध नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भोपाळ दौऱ्यावर आहेत. तेथे तिहेरी तलाकवर वक्तव्य करताना ते म्हणाले की, 'मुस्लिम समाजात चुकीचा संभ्रम पसरवला जात आहे. कॉमन सिव्हिलबाबतचा गोंधळ भाजप दूर करेल'.

Narendra Modi
नरेंद्र मोदी

By

Published : Jun 27, 2023, 7:17 PM IST

पहा काय म्हणाले नरेंद्र मोदी

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना तिहेरी तलाकवर सडेतोड वक्तव्य केले. तिहेरी तलाकचा इस्लामशी काहीही संबंध नाही. याबाबत मुस्लीम समाजात चुकीचा संभ्रम पसरवला जात असल्याचे मोदी म्हणाले. यासोबतच समान नागरी संहितेवर वक्तव्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, एकाच कुटुंबातील एका सदस्यासाठी एक कायदा आणि दुसऱ्या सदस्यासाठी दुसरा कायदा असणे योग्य नाही.

'जगातील अनेक देशांमध्ये तिहेरी तलाक नाही' :पंतप्रधान मोदी म्हणाले की, तिहेरी तलाकबाबत मुस्लिम समाजात चुकीचा संभ्रम पसरवला जात आहे. जगात अनेक देश असे आहेत जेथे 90 वर्षांपूर्वीच तिहेरी तलाकचा कायदा रद्द करण्यात आला होता. इजिप्त, इजिप्त, इंडोनेशिया, कतार, जॉर्डन, बांगलादेश आणि अगदी पाकिस्तानातही तिहेरी तलाकचा कायदा लागू नाही, असे ते म्हणाले. तिहेरी तलाक इस्लामशी संबंधित आहे असे म्हणणारे, लोकांना चुकीची माहिती देत ​​आहे. त्यांनी लोकांना हे समजावून सांगावे, असे पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले.

'मुस्लिमांना आत्तापर्यंत शिक्षणापासून वंचित ठेवले' : पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'आतापर्यंतच्या सरकारांनी मुस्लिमांचा वापर केवळ आपली व्होट बँक म्हणून केला आहे. बहुतेक वेळा ते मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करत राहिले आणि मुस्लिमांना शिक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे मुस्लिम समाज निरक्षरता, गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त आहे'. मोदी म्हणाले की, 'मुस्लिमांमध्येही वर्गविभाजन आहे. त्यामुळे पसमंदा मुस्लिम गरिब आहेत. असे अनेक मुस्लिम समाज आहेत, ज्यांना मागासलेल्या आणि दलितांसारखे वागवले जात आहे'. पंतप्रधान म्हणाले की, मोची, भेजा, जुलाहा, योगी सिकंदर, हलदार, लहरी दुनिया, कटाई, फकीर, केशभूषाकार, सफाई कामगार, ग्वाला, लोहार, सुतार, मनिहार आणि शिंपी हे मुस्लिम मागासलेले राहिल. त्यांच्याबद्दल कोणीही विचार केला नाही. आजवर ते अस्पृश्याप्रमाणे जगत आहेत. नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, त्यांनी या मुस्लिमांना भाजपच्या जवळ आणण्यासाठी आणि त्यांना भाजपशी जोडण्यासाठी त्यांची भेट घेतली पाहिजे.

एक देश - एक कायदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत मुस्लिमांना रोजगार, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या बाबतीत पुढे जाण्यासाठी समान नागरी संहिता लागू करणे आवश्यक असल्याचे सांगितले. एकाच कुटुंबात एका सदस्यासाठी दुसरा कायदा आणि दुसऱ्या सदस्यासाठी दुसरा कायदा असणे योग्य नाही, असे मोदींचे म्हणणे आहे.

महागाईच्या प्रश्नाला उत्तर : महागाईबाबतच्या प्रश्नाना उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी भारताची तुलना शेजारच्या देशांशी केली. ते म्हणाले की संपूर्ण जग महागाईने हैराण झाले आहे. पाकिस्तानमध्ये चलनवाढीचा दर 35 टक्के आहे. श्रीलंकेत चलनवाढीचा दर ३० टक्के आहे. बांगलादेशात २५ टक्के आहे. पण भारतात महागाईचा दर फक्त ५ टक्के आहे. मोदी म्हणाले की पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पण ज्या राज्यांमध्ये काँग्रेस किंवा इतर पक्षांची सरकारे आहेत, तिथे पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तेथे पेट्रोल 100 रुपयांपेक्षा कमी दराने विकले जात आहे.

हेही वाचा :

  1. Narendra Modi on Sharad Pawar : 'शरद पवारांच्या मुलीचे भले करायचे असेल तर.... '; मोदींचा पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल
  2. Modi On Opposition : 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाई करण्याचे मोदींचे आश्वासन

ABOUT THE AUTHOR

...view details