भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून 5 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. एकाच स्थानकावरून 5 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखविण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापैकी दोन गाड्यांना मोदी स्टेशनवर उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवतील, तर उर्वरित गाड्यांना व्हर्च्युअली हिरवा झेंडा दाखवला जाईल. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राणी कमलापती रेल्वे स्थानकावर ठोस व्यवस्था करण्यात आली आहे. भोपाळ रेल्वे विभाग व्यवस्थापनाने रविवारपासून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 बंद केला आहे.
नरेंद्र मोदी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यापैकी दोन वंदे भारत ट्रेन मध्य प्रदेशात धावणार आहेत.
- वंदे भारत ट्रेन भोपाळ ते इंदूर आणि जबलपूर ते भोपाळ दरम्यान धावेल, ज्याला पंतप्रधान 27 जूनला हिरवा झेंडा दाखवतील.
- पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 1 एप्रिल रोजी भोपाळ ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.
- या दोन नव्या गाड्यांनंतर मध्य प्रदेशातील वंदे भारत गाड्यांची संख्या 3 होईल.
- पंतप्रधान मोदी पाटणा ते रांची दरम्यान वंदे भारत ट्रेनला डिजिटल हिरवा झेंडा दाखवतील.
- पंतप्रधान मडगाव-मुंबई सीएसटी आणि धारवाड-केएसआर बेंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
- या पाच नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर देशात वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या 23 होणार आहे.
- आत्तापर्यंत गोवा, झारखंड आणि बिहारमध्ये एकही वंदे भारत ट्रेन चालू नव्हती.