अहमदाबाद :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Hiraba Modi admitted to hospital for treatment ) होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या आईची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले ( PM Modi Reached Ahmedabad ) होते. आईच्या तब्येतीची माहिती घेण्यात आली
pm Narendra Modi Mother : पंतप्रधान मोदींच्या आई हीराबा यांच्या प्रकृतीत सुधारणा, उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज
रुग्णालयात दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबा यांच्या प्रकृतीत सुधारणा ( Heraba Health Improve ) होत आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक-दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आता त्यांना आहार दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात ( Ahmedabad UN Mehta Hospital ) पोहोचले, जिथे हीराबा दाखल आहेत, त्यांनी त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे सुमारे दीड तास थांबले. ( pm Narendra Modi Mother Heraba Health Improve )
सुरक्षा यंत्रणा तैनात :यावेळी पोलिसांना सतर्क करण्यात आले होते, सुरक्षा यंत्रणा तैनात ( Security system deployed ) करण्यात आली होती. नरोडा, सरदारनगर तसेच विमानतळ पोलिसांच्या कर्मचाऱ्यांच्या ठाण्यांना सुरक्षा देण्यात आली असून, युएन मेहता हॉस्पिटलसह पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
हिराबा यांच्या प्रकृतीत सुधारणा : पंतप्रधान मोदींच्या आई हिराबा यांची प्रकृती ठीक नाव्हती, त्यामुळे त्यांना UN मेहता हॉस्पिटलमध्ये ( Ahmedabad UN Mehta Hospital ) दाखल करण्यात आले होते. यूएन मेहता हॉस्पिटलच्या बुलेटिननुसार, हिराबा यांची प्रकृती सध्या सुधारत आहे. पंतप्रधान मोदींच्या आई 100 वर्षांच्या आहेत. यूएन मेहता रुग्णालयाचे अधिकृत बुलेटिन आले असून, हिराबा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी 108 वर कॉल करून त्यांना गांधीनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. एवढेच नव्हे तर सामान्य रुग्णांप्रमाणेच रुग्णालयातील जनरल वॉर्डात त्यांची तपासणी करण्यात आली होती.