महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळावर पंतप्रधान मोदींची आढावा बैठक, किनारपट्टीवरील नागरिकांचे स्थलांतरण सुरु

गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. सध्या, सर्व 6 बाधित जिल्ह्यांमध्ये स्थलांतर मोहीम सुरू करण्यात आली असून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

NARENDRA MODI MEETING
नरेंद्र मोदींनी बैठक

By

Published : Jun 12, 2023, 5:38 PM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि मुख्य सचिव राजकुमार यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चक्रीवादळ बिपरजॉयचा आढावा घेतला. हे चक्रीवादळ 15 जूनला कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 55 किमी झाल्यावर सर्व वाहतूक सुविधा बंद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

स्थलांतरण सुरु, शाळांना सुटी जाहीर : बिपरजॉय चक्रीवादळ सध्या गुजरात किनारपट्टीपासून केवळ 300 ते 400 किमी दूर आहे. ते ताशी 15 किमी वेगाने गुजरातकडे सरकत आहे. सध्या सर्व 6 बाधित जिल्ह्यांमध्ये स्थलांतराची कारवाई सुरू करण्यात आली असून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. गुजरातच्या द्वारका, पोरबंदर, जामनगर, कच्छ आणि गीर सोमनाथ या सहा किनारी जिल्ह्यांमध्ये एकूण 25 तालुके समुद्रकिनारी आहेत. जवळपास 12,27,000 लोक किनार्‍यापासून 25 किमीच्या परिसरात राहत आहेत. या सर्व लोकांना आवश्यकतेनुसार बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या गरोदर महिला बालके, आजारी व्यक्तींना प्राधान्य दिले जात आहे.

सर्व जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ तैनात : मदत आयुक्त आलोक कुमार पांडे पुढे म्हणाले की, चक्रीवादळ ज्या प्रकारे प्रगती करत आहे, ते अधिक धोकादायक बनत आहे. ते लक्षात घेऊन, एनडीआरएफच्या टीमना किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आले आहे. ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील तेव्हा वाहतुकीसह रेल्वेमार्गही बंद करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्र्यांना दिल्या जबाबदाऱ्या : राज्य सरकारने रविवारी राज्यमंत्र्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. तसेच केंद्र सरकारनेही केंद्रीय नेत्यांना जबाबदारी दिली आहे. कुमार पांडे म्हणाले की, वादळाच्या पार्श्वभूमीवर वीज कंपन्यांनाही स्टँडबायवर ठेवण्यात आले असून वारा अधिक वेगाने वाहत असल्यास विजेचे खांबही पडतील. ताशी 60 किमी वेगाने वारे वाहतील तेव्हा वीजपुरवठा बंद होईल. याशिवाय सहा जिल्ह्यांतील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

  1. Cyclone Biparjoy updates: बिपरजॉय बनले धोकादायक, गुजरातच्या सात जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस; मुंबईतील जोरदार वादळामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम

ABOUT THE AUTHOR

...view details