महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

International Day of Yoga : पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांमध्ये साजरा करणार आंतरराष्ट्रीय योग दिन; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन - आंतरराष्ट्रीय योग दिवस

जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पंतप्रधान अमेरिकेत संध्याकाळी योग दिन साजरा करतील.

पंतप्रधान नरेंद्र   मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Jun 21, 2023, 7:32 AM IST

नवी दिल्ली : आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत, ते संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिन साजरा करणार आहेत. संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सदस्यांसह पंतप्रधान मोदी योग दिवस साजरा करणार आहेत.

संयुक्त राष्ट्र महासचिव करतील योगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 25 मिनीट ते संध्याकाळी साडेसहा वाजून संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात योगसन करतील. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुतरेस आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध देशातील राजदूत तसेच नेते सहभागी होतील. दरम्यान योग दिन साजरा करण्यासाठी आणि प्राचीन भारतीय प्रथेच्या फायद्यांबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

संरक्षण मंत्रीदेखील करतील योगा : गृहमंत्री राजनाथ सिंह हे स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतवर योगासने करण्यासाठी भारतीय नौदलाच्या जवानांमध्ये सामील होतील. या कार्यक्रमात नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, नौदल कल्याण आणि कल्याण संघटनेचे अध्यक्ष कला हरी कुमार यांच्यासह भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अग्निवीरांसह सशस्त्र दलाचे जवान या कार्यक्रमात एकता आणि कल्याणाची भावना अंगी घेत हा दिवस साजरा करतील. योग सत्रानंतर संरक्षण मंत्री उपस्थितांना संबोधित करतील आणि योग प्रशिक्षकांचा सत्कार करतील.

योगदिनाची थीम : भारतीय नौदल 'ओशन रिंग ऑफ योग' या थीमवर भर देणार्‍या भारतीय नौदलाच्या आउटरीच कार्यावर एक विशेष व्हिडिओ प्रसारित करेल. तर हिंद महासागर क्षेत्रात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या तुकड्या "वसुधैव कुटुंबकम" चा संदेश देण्यासाठी मैत्रीपूर्ण परदेशी देशांच्या विविध बंदरांना भेट देतील. " ही या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम देखील आहे. 2014 मध्ये एका ठरावाद्वारे UN ने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस मान्य करण्यात आला. याला आज 9 वर्ष होत आहेत.

हेही वाचा -

  1. PM Modi US Visit : भारत-अमेरिकेतील 'हे' पाच मोठे संरक्षण करार चीन, पाकिस्तानची झोप उडवतील! जाणून घ्या
  2. Pm Modi to Meet Elon Musk : पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार एलन मस्कची भेट, अमेरिका दौऱ्यात 'या' उद्योगपतींनाही भेटणार

ABOUT THE AUTHOR

...view details