नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील वडोदरा येथे C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग ( C 295 transport aircraft manufacturing ) प्लांटची पायाभरणी करणार ( PM foundation stone ) आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजताबाहेर गेल्याने महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये मोठा प्रकल्प येत आहे.
असा आहे प्रकल्पनुकतीच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ( Cabinet Committee on Security ) ने टाटा-एअरबस कंबाइनद्वारे ( Tata Airbus Combine ) भारतात बनवल्या जाणार्या नवीन लष्करी वाहतूक विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. भारतीय खाजगी क्षेत्रासोबत असा हा पहिलाच लष्करी विमान वाहतूक करार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात राज्यात 6 हजारापेक्षा जास्त रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. टाटा- एअरबस यांच्यातील 22 हजार कोटींच्या करारावर 2012 पासून काम सुरू आहे. बऱ्याच विलंबानंतर काम पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरात जोर देण्यात आला आहे. पहिले प्रकरण आहे ज्यामध्ये खाजगी क्षेत्रासह वैकल्पिक एरोस्पेस कॉम्प्लेक्सला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्राला जोडले जाणार आहे.
खाजगी क्षेत्रावर सर्वात मोठा लष्करी आदेश -हवाई दलासाठी नवीन वाहतूक विमाने तयार करण्याचा करारावर शुक्रवारी स्वाक्षरी करण्यात आली. 22 हजापर कोटी रुपयांचा हा करार खाजगी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि संरक्षण उत्पादनातील सरकारी मालकीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी तयार करण्यात आला आहे.