महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अदार पुनावाला यांच्यासह कोरोना लस उत्पादकांशी साधला संवाद; 'ही' झाली चर्चा - Health Minister Mansukh Mandaviya

भारताने कोरोना लसीकरणात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लशींच्या उत्पादकांशी विविध विषयावर चर्चा केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांच्याशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी अदार पुनावाला
पंतप्रधान मोदी अदार पुनावाला

By

Published : Oct 23, 2021, 5:45 PM IST

Updated : Oct 23, 2021, 10:50 PM IST

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लशींच्या उत्पादकांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांच्याशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारदेखील उपस्थित होत्या.

भारताने कोरोना लसीकरणात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लशींच्या उत्पादकांशी विविध विषयावर चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लस उत्पादकांशी लशींच्या संशोधनाबाबतही चर्चा केली. या बैठकीला सात कोरोना लस उत्पादक उपस्थित होते. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ. रेड्डीज लॅबोरटीरीज, झायडस कॅडिला, बायोलॉजीकल ई, जिनोव्हा बायोफार्मा आणि पॅनाका बायोटेकचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उद्योग आणि सरकारने एकत्रित काम करण्याबाबत चर्चा-

पंतप्रधानांच्या व्हिजनप्रमाणे आरोग्य क्षेत्राने सरकारसोबत मैलाचा दगड गाठला आहे. आम्ही पंतप्रधानांसमवेत आरोग्य क्षेत्र हे पुढे कसे नेता येईल व भविष्यात महामारीची तयारी कशी करायची याबाबत चर्चा केली आहे. आम्ही सतत क्षमता विस्तारत आहोत, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी माहिती दिली. लस क्षेत्राला पुढे नेण्यासाठी आम्ही अनेक विषयावर चर्चा केली आहे. सर्व जग हे कोरोना लशीत गुंतवणूक करणार आहे. त्यामध्ये भारताने पुढे राहण्याची गरज आहे. उद्योग आणि सरकारने एकत्रित काम करण्याबाबत चर्चा केल्याचेही पुनावाला यांनी सांगितले.

हेही वाचा-आमच्याकडे तक्रारदार गायब असूनही खोदून-खोदून चौकशी- उद्धव ठाकरेंचा परमबीर सिंगसह केंद्राला टोला

असे आहे देशातील कोरोना लशींचे प्रमाण-

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशामध्ये कोरोना लशींची आकडेवारी 101.30 कोटीहून अधिक आहे.
  • देशामध्ये कोरोना लसीकरणाचा आकडा 21 ऑक्टोबरला 100 कोटीहून अधिक झाला आहे. त्यानिमित्ताने देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहाने हा आनंद साजरा करण्यात आला.
  • देशातील 75 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येने कोरोना लशीचा किमान एक डोस घेतला आहे.
  • देशामध्ये 31 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येने कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतले आहेत. ही लोकसंख्या सुमारे 93 कोटी आहे.
  • 9 राज्ये आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्व प्रौढांनी कोरोना लशीचा एक डोस घेतला आहे.
  • देशामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडन कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि स्पूटनिक व्ही या तीन कोरोना लशींचे उत्पादन घेण्यात येते.

हेही वाचा-ड्रग्स प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी केली जाते - गृहमंत्री वळसे पाटील

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी येथील नुकतेच सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली होती.

ट्विटमध्ये भारती पवार काय म्हणाल्या?

'आज मी लसींच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक असलेल्या आदर पुनावाला यांच्या नेतृत्त्वातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट दिली. विशेषत: जेव्हा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या नागरिकांचे 100 कोटी लसीकरण साध्य करण्याच्या मार्गावर आहोत. यावेळी भारतातील कोविड लसीकरण मोहिमेत महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त केली', असे ट्विट त्यांनी केले.

हेही वाचा-बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारशी चर्चा सुरू, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री जरदोश यांच्याशी खास बातचित

Last Updated : Oct 23, 2021, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details