भिलवाडा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानातील भिलवाडा येथील मालसेरी डोंगरी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी जाहीर सभेला संबोधित करताना भगवान देवनारायण आणि जनतेचे दर्शन घेऊन मी धन्य झालो. भगवान देवनारायणांचे बोलावणे आले आणि मी आलो नाही, असे होणार नाही. त्यामुळे तात्काळ येथे आलो. देवाकडे मी देश आणि जनतेच्या समृद्धीची कामना करण्यासाठी आल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यासह त्यांनी यावेळी जुर्जर समाजाने अभिनंदन केले. समाजातील प्रत्येक व्यक्तींचे विकासात योगदान असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी गुर्जर समाजाचे तोंड भरुन कौतुक केले.
कूप्रथा दूर केली :भगवान देवनारायण यांनी केवळ 31 व्या वर्षी अमर झाले हे केवळ एका अवतार पुरुषालाच शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भगवान देवनारायण यांनी समाजातील कुप्रथा दूर केल्या. यामुळेच समाजात त्यांचे स्थान कुटुंब प्रमुख म्हणून असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळेच नागरिक त्यांचे सुख-दु:ख भगवान देवनारायण यांच्यापुढे कथन करतात. त्यामुळे भगवान देवनारायण यांनी आपली शक्ती लोककल्याणासाठी वापरली असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
वैचारिकदृष्ट्या तोडण्याचे प्रयत्न :भारताला भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या तोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र कोणतीही शक्ती भारताला नष्ट करू शकली नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. भारत ही केवळ एक भूमी नाही, तर ती आपली सभ्यता, संस्कृती, सौहार्द आणि क्षमता यांची अभिव्यक्ती आहे. काळाच्या बदलांसोबत स्वतःला साचेबद्ध करू न शकलेल्या जगातील बर्याच संस्कृती काळाबरोबर संपुष्टात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विकासाच्या मार्गावर वाटचाल :गेल्या 8-9 वर्षांपासून उपेक्षित आणि वंचित असलेल्या समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा देश प्रयत्न करत आहे. भगवान देवनारायण यांनी दाखवलेला मार्ग सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या विकासाचा आहे. आज देश याच मार्गावर वाटचाल करत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.