महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Narendra Modi : नरेंद्र मोदींनी घेतली इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांची भेट, चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनंदन केलं

चंद्रयान ३ च्या टीममध्ये सहभागी असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी बंगळुरुत दाखल झाले. बंगळुरू विमानतळावर त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तेथे त्यांनी उपस्थित लोकांना संबोधित केलं.

Narendra Modi
नरेंद्र मोदी

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 6:55 AM IST

Updated : Aug 26, 2023, 7:49 AM IST

बंगळुरु :चंद्रयान 3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी बंगळुरूत दाखल झाले. तेथे त्यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेतली आणि चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केलं.

विमानतळावर ढोल वाजवून स्वागत : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी बंगळुरूमधील एचएएल विमानतळाबाहेर स्थानिक लोक पहाटेपासून वाट पाहत जमले होते. मोदींचे आगमन होताच स्थानिक कलाकारांनी ढोल वाजवून आणि नृत्य करुन त्यांचं स्वागत केलं. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या दोन देशांचा दौरा आटोपून मोदी येथे पोहोचले आहेत.

विमानतळाबाहेर 'जय विज्ञान-जय अनुसंधान' घोषणा दिली : पंतप्रधान मोदींनी विमानतळाबाहेर 'जय जवान, जय विज्ञान, जय अनुसंधान' ही घोषणा दिली. 'आज बंगळुरुमध्ये दिसणारे हे दृश्य जोहान्सबर्ग आणि ग्रीसमध्येही दिसले. मी परदेशात असतानाच ठरवलं होतं की भारतात गेल्यावर आधी बंगळुरुला भेट देईन. सर्वप्रथम मी आपल्या शास्त्रज्ञांना सलाम करतो. शास्त्रज्ञांना भेटल्यानंतरच मी निघेन', असे नरेंद्र मोदी म्हणाले.

बंगळुरुमध्ये पुरेसा बंदोबस्त : एचएएल विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झाल्यानंतर सरकारच्या वतीनं मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी त्यांचे स्वागत केलं. बंगळुरुमध्ये डीजीपी आलोक मोहन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं पुष्प अर्पण करुन स्वागत केलं. येथून जलाहल्ली क्रॉस मार्गे पंतप्रधान इस्रो कार्यालयात पोहोचतील. पंतप्रधानांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुमध्ये पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रस्ते मार्ग बदलण्यात आले आहेत.

नरेंद्र मोदींचे ट्विट : शनिवारी पहाटे बंगळुरुत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं. 'मी आमच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यास उत्सुक आहे. चंद्रयान ३ च्या यशानं जगभरात भारताचा गौरव झालाय. शास्त्रज्ञांचं समर्पण आणि उत्कटता हीच खऱ्या अर्थानं अवकाश क्षेत्रातील आपल्या देशाच्या यशामागं प्रेरक शक्ती आहे', असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. Chandrayaan 3: चंद्रयानाच्या लॅंडिंगनंतर प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लॅंडरची कशी आहे स्थिती?, जाणून घ्या शास्त्रज्ञांकडून माहिती
  2. Modi Jinping Meet : सीमेवर तणाव अन् मोदी-जिनपिंग यांच्यात भेट; दोन नेत्यांमध्ये काय झाली चर्चा?
Last Updated : Aug 26, 2023, 7:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details