महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cabinet Meeting : परदेशातून परतल्यानंतर मोदींनी घेतली मंत्रिमंडळाची बैठक, मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा

अमेरिका आणि इजिप्तच्या राजकीय दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचाराची माहिती घेतली.

Narendra Modi
नरेंद्र मोदी

By

Published : Jun 26, 2023, 4:09 PM IST

नवी दिल्ली : अमेरिका आणि इजिप्तचा राजकीय दौरा आटोपून रविवारी रात्री दिल्लीत पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन, हरदीप सिंग पुरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांना मणिपूरमधील घडामोडींची माहिती दिली. रविवारी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी शाह यांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली आणि सांगितले की, राज्य आणि केंद्र सरकार हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे.

शनिवारी सर्वपक्षीय बैठक झाली : मणिपूरमधील सद्य परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमित शाह यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. हिंसाचारग्रस्त राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा आणि सीपीआय (मार्क्सवादी) खासदार जॉन ब्रिटास यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

भाजप खासदारांनी केले मोदींचे स्वागत : अमेरिका आणि इजिप्तचा सहा दिवसांचा राजकीय दौरा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पहाटे दिल्लीत दाखल झाले. पालम विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, हंस राज हंस आणि गौतम गंभीर यांच्यासह पक्षाच्या विविध खासदारांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. आदल्या दिवशी, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर इजिप्तच्या त्यांच्या पहिल्या भेटीचे काही क्षण शेअर केले होते.

इजिप्त भेट ऐतिहासिक होती - मोदी : मोदींनी इजिप्त दौऱ्यात इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मादबौली, राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल सिसी यांची भेट घेत भारतीय डायस्पोराशी संवाद साधला. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधान मोदींनी क्लिप टॅग करून संदेश दिला की, 'माझी इजिप्त भेट ऐतिहासिक होती. यामुळे भारत-इजिप्त संबंधांना नवीन बळ मिळेल आणि आपल्या देशांतील लोकांना फायदा होईल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी राष्ट्राध्यक्ष अल सिसी सरकार आणि इजिप्तच्या लोकांच्या प्रेमाबद्दल आभार मानतो. पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते, तर 24 ते 25 जून दरम्यान ते इजिप्तच्या दौऱ्यावर होते.

हेही वाचा :

  1. Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द नाईल' ने सन्मानित
  2. Biden Gift To Modi : 'AI भविष्य आहे', बायडन यांनी मोदींना भेट दिलेल्या टी-शर्टवर काय लिहिले आहे?, जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details