महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Namo Medical Collage : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दादरा नगर हवेलीत करणार पाच हजार कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण - मो मेडिकल रिसर्च सेंटर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दादरा नगर हवेली आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दादरा नगर हवेलीत मोठ्या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे.

Narendra Modi Will Inaugurate Namo Medical Collage
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 25, 2023, 10:11 AM IST

सेलवास : दादरा नगर हवेली येथील सेलवासमध्ये 13 एकर जागेवर 260 कोटी रुपये खर्चून नमो मेडिकल कॉलेज बांधण्यात आले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महाविद्यालयाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी या ठिकाणी 50 हजारांहून अधिक नागरिकांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दादरा नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशातील नमो मेडिकल कॉलेजसह 5 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा :पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दादरा नगर हवेली आणि दमण दीवला भेट देणार असल्याने तेथील नागरिकांसाठी मोठ्या उत्साहाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेलवास येथे नमो मेडिकल रिसर्च सेंटरचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान 50 हजार नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी दादरा नगर हवेली प्रशासनाकडून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबत सेलवासच्या उपजिल्हाधिकारी चार्मी पारेख यांनी महत्त्वाची माहिती दिली. 25 एप्रिलला दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरने सेलवासला येणार आहेत. त्यानंतर राज्यात बांधल्या जाणाऱ्या नमो मेडिकल कॉलेजचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान महाविद्यालयाला भेट देऊन तेथील उपलब्ध सुविधांची माहिती घेतील. त्यानंतर पंतप्रधान जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी चार्मी पारेख यांनी दिली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते होणार विविध प्रकल्पांचे लोकार्पण :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेसाठी 65 हजार खुर्च्यांची व्यवस्था असलेला मंडप तयार करण्यात आला आहे. उन्हाचा तडाखा पाहता प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. पंखे, एअर कूलरची या मंडपात व्यवस्था केली आहे. कार्यक्रमस्थळी 9 वाहनतळ करण्यात आले आहेत. पादचाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांसाठी पाण्याशिवाय लिंबूपाणी, ओआरएस, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. सेलवास मैदानावर नमो मेडिकलचे उद्घाटन करण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ हजार ८५० कोटींहून अधिक किमतीच्या ९६ प्रकल्पांची पायाभरणी आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे लोकार्पण करतील. या प्रकल्पांमध्ये दादरा आणि नगर हवेलीमधील विविध रस्त्यांचे सुशोभीकरण, मजबुतीकरण आणि रुंदीकरण, दादरा आणि नगर हवेली जिल्ह्यातील मोरखल, खेर्डी, सिंदोनी आणि मसाट येथील सरकारी शाळांचा समावेश आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत महाराष्ट्राचे जवान :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी, कमांडो कर्मचारी, बीएसएफ जवानांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रातूनही जवानांची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या ताफ्यात महाराष्ट्रातील जवानही तैनात करण्यात आले आहेत. दादरा नगर हवेलीत पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी प्रशासनासोबतच भाजप पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही विशेष तयारी केली आहे. सेलवास शहर आणि मार्गावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. कॉलेज कॅम्पस आणि इतर इमारती रोषणाईने सजल्या आहेत.

हेही वाचा - Kedarnath Dham Door Open : बाबा केदारनाथांचे दरवाजे उघडल्याने भाविकांना घेता येणार दर्शन; चारधाम यात्रेचा झाला प्रारंभ

ABOUT THE AUTHOR

...view details