महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Modi In Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरला 20 हजार कोटींची भेट, 370 चा उल्लेख करत पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका - पंतप्रधान मोदी काँग्रेस टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील ( PM Narendra Modi In Jammu And Kashmir ) सांबा येथे जनतेला संबोधित केले. पंचायती राज दिनी ( Panchanyat Raj Day ) संबोधित करताना पंतप्रधानांनी केंद्राने राज्यात सुरू केलेल्या प्रकल्पांबद्दल तपशीलवार माहिती दिली.

PM Modi In Jammu And Kashmir
PM Modi In Jammu And Kashmir

By

Published : Apr 24, 2022, 5:34 PM IST

सांबा ( जम्मू काश्मीर ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील ( PM Narendra Modi In Jammu And Kashmir ) सांबा येथे जनतेला संबोधित केले. पंचायती राज दिनी ( Panchanyat Raj Day ) संबोधित करताना पंतप्रधानांनी केंद्राने राज्यात सुरू केलेल्या प्रकल्पांबद्दल तपशीलवार माहिती दिली. केंद्राच्या योजनांमुळे राज्यात ऐतिहासिक बदल होत आहेत. नवी विकासगाथा लिहिली जात आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी दिल्लीतून फायली यायला खूप वेळ लागायचा, पण आता तसे नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेच्या तीन रस्त्यांची घोषणा त्यांनी यावेळी केली. ज्यासाठी 7,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. इतर प्रकल्पांपैकी मोदी रतले आणि क्वार जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील. रतले जलविद्युत प्रकल्प हा किश्तवाडमधील चिनाब नदीवर सुमारे 5,300 कोटी रुपये खर्चाचा 850 मेगावॅटचा युनिट आहे. तसेच यावेळी त्यांनी याच नदीवर 4,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधल्या जाणाऱ्या 540 मेगावॅट क्वार जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपुजनही त्यांनी केले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये 'जन औषधी केंद्रां'चे जाळे आणखी विस्तारण्यासाठी आणि वाजवी दरात चांगल्या दर्जाची जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी 100 केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ही केंद्रे केंद्रशासित प्रदेशाच्या दूरच्या कोपर्‍यात आहेत.

हेही वाचा -PM Modi Mumbai Visit : लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्यासाठी मोदी मुंबईत, कार्यक्रमाला मुख्यमंत्री ठाकरेंची अनुपस्थिती

ABOUT THE AUTHOR

...view details