वाराणसी Modi Convoy Way To Ambulance : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, मोदींचा ताफा विमानतळावरून छोट्या कटिंग ग्राउंडच्या दिशेनं जात असताना वाटेत एक अशी घटना घडली, ज्यानंतर सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
मोदींच्या ताफ्यामागून रुग्णवाहिका आली : झालं असं की, पंतप्रधान मोदींचा ताफा विमानतळावरून छोट्या कटिंग ग्राउंडच्या दिशेने जात असताना वाटेत ताफ्याच्या मागून एक रुग्णवाहिका आली. या रुग्णवाहिकेत एक रुग्ण होता. आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या या रुग्णाला तातडीनं दवाखान्यात दाखल करणं आवश्यक होतं. यामुळे रुग्णवाहिका नो एंट्रीचा विचार न करता वेगानं पुढे जात होती.
ताफ्यानं रुग्णवाहिकेला रस्ता दिला : एका ठिकाणी ही रुग्णवाहिका पंतप्रधान मोदींच्या ताफाच्या मागे आली. तिनं रस्ता मागण्यासाठी सायरन वाजवला. हे पाहून मोदींच्या ताफ्याच्या सुरक्षेमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी आपली वाहनं बाजूला केली आणि रुग्णवाहिकेला पुढे जाऊ दिलं. या घटनेचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होतो आहे.
मोदींचा दोन दिवसीय काशी दौरा : या घटनेपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींचं विमानतळावर जंगी स्वागत केलं. मोदी विमानतळाबाहेर येताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात काशी आणि पूर्वांचलमध्ये १९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ३७ प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करमार आहेत. या सोबतच मोदी स्वरवेद मंदिर आणि काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचं देखील उद्घाटन करतील. या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित असतील.
हे वाचलंत का :
- संसदेच्या सुरक्षेचा भंग अत्यंत गंभीर, विरोधकांनी वाद निर्माण करू नये - पंतप्रधान मोदी
- नवीन विचार आणि नवीन कल्पनांबद्दल मोकळेपणा गमावू नका - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
- पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर; 26 तासांच्या दौऱ्यात वाराणसीकरांना देणार 19 हजार कोटी रुपयांचे 'गिफ्ट'