महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Modi Flagged Off Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला पाच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा, गोवा मुंबई रेल्वेचाही समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून 5 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यापैकी 2 वंदे भारत मध्यप्रदेशात चालणार आहेत, तर एक मडगाव मुंबई या गोव्यात जाण्यासाठी सोयीची असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचाही समावेश आहे.

PM Modi Flagged Off Vande Bharat
संपादित छायाचित्र

By

Published : Jun 27, 2023, 2:02 PM IST

Updated : Jun 27, 2023, 2:12 PM IST

भोपाळ :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आज पाच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला असून यात मडगाव मुंबई या महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचाही समावेश आहे. भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ-इंदूर आणि राणी कमलापती-जबलपूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला प्रथम हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला पाच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

गोवा मुंबई वंदे भारतला दाखवला झेंडा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची-पाटणा व्यतिरिक्त धारवाड आणि केएसआर बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी गोवा-मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतला झेंडा दाखवून गोवेकर प्रवाशांना खूश केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसमुळे मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, बिहार आणि झारखंडमधील कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याचा विश्वास ट्विट करुन व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला मुलांशी संवाद :यावेळी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी या शाळकरी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी काढलेली चित्रे भेट दिली.

नागरिकांमध्ये आनंदोत्सव :भोपाळ ते इंदूर आणि जबलपूर ते भोपाळ दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या दोन नव्या गाड्यांनंतर मध्य प्रदेशातील वंदे भारत गाड्यांची संख्या 3 झाली आहे. या पाच नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर देशात वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या 23 झाली आहे.

हेही वाचा -

  1. Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दाखविला हिरवा झेंडा
  2. Mumbai Goa Vande Bharat Express : मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा कंदील, उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत
Last Updated : Jun 27, 2023, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details