महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM मोदी दोन दिवसांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर; समुद्रकिनाऱ्यावर लुटला आनंद, पाहा भन्नाट फोटो

PM Narendra Modi Lakshadweep Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी समुद्राखालील जीवन पाहण्याचा आनंद लुटला. या दौऱ्याची काही छायाचित्रंही त्यांनी सोशल मीडिया हँडलवर शेअर करून आपला अनुभव व्यक्त केलाय.

PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 8:53 PM IST

नवी दिल्ली PM Narendra Modi Lakshadweep Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान मोदींनी समुद्राखालील जीवन पाहण्यासाठी स्नॉर्कलिंग (समुद्राखाली पोहणं) केलं. याबाबत मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर समुद्राखालील छायाचित्रं पोस्ट केली आहेत. तसंच अशाचप्रकारचा अरबी समुद्रात घेतलेल्या आनंदाचा त्यांनी रोमांचक अनुभव शेअर केलाय.

समुद्रकिनाऱ्यांवर मॉर्निंग वॉकचा आनंद :'X' वर त्यांनी लिहिलं की, 'ज्यांना रोमांचक अनुभव घ्याचा आहे, त्यांच्यासाठी लक्षद्वीप बेट फिरण्याच्या यादीत प्राथमिकता असलं पाहिजे. या दौऱ्यादरम्यान मी स्नॉर्कलिंगचाही अनुभव घेतलाय. हा सर्व रोमांचक अनुभव होता.' मोदींनी लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यांवर मॉर्निंग वॉकची छायाचित्रं देखील शेअर केली आहेत.

लक्षद्वीपची शांतताही मनमोहक : त्यांनी पुढं लिहिलं की, 'नैसर्गिक सौंदर्यासोबतच लक्षद्वीपची शांतताही मनमोहक आहे. 140 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कठोर परिश्रम कसं करता येतील, याचा विचार करण्याची संधी मला येथे येऊन मिळाली. यासोबतच मला लक्षद्वीपच्या लोकांमध्ये राहण्याची संधी मिळाली. मी अजूनही त्यांच्या बेटांचं आश्चर्यकारक सौंदर्य, तेथील लोकांच्या अविश्वसनीय उबदारपणानं आश्चर्यचकित झालो आहे. मला अगट्टी, बंगाराम, कावरत्ती येथील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. बेटांवरील लोकांच्या आदरातिथ्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.' कोची-लक्षद्वीप बेटे, सबमरीन ऑप्टिकल फायबर कनेक्शनचं उद्घाटन करण्यासाठी मोदी दोन दिवस लक्षद्वीपमध्ये आहेत. याचबरोबर प्राथमिक आरोग्य सुविधा, पाच अंगणवाडी केंद्रांच्या नूतनीकरणाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय.

लोकांचं जीवनमान उंचावण्यावर लक्ष : लक्षद्वीपमधील सरकारचं लक्ष प्रगत विकासाद्वारे लोकांचं जीवनमान उंचावण्यावर आहे. भविष्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसोबतच, उत्तम आरोग्य सेवा, जलद इंटरनेट, पिण्याच्या पाण्याच्या योजना निर्माण करण्याबरोबरच स्थानिक संस्कृतीचा उत्सव साजरा करण्याबद्दलही सरकार कटिबद्ध आहे. ज्या प्रकल्पांचं उद्घाटन झालं, ते याच भावनेचं दर्शन घडवतात. विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी उत्तम संवाद साधलाय. हे उपक्रम उत्तम आरोग्य, स्वावलंबन, महिला सबलीकरण, उत्तम कृषी पद्धती पाहण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. हे प्रत्यक्ष पाहणं प्रेरणादायी आहे. मी ऐकलेला जीवन प्रवास खरोखर हृदयस्पर्शी आहे. लक्षद्वीप हा केवळ बेटांचा समूह नाही, तर तो परंपरेचा वारसा, तेथील लोकांच्या भावनेचा दाखला आहे, असं मोदींनी लिहलंय.

हेही वाचा -

  1. हिटलरच्या प्रचार यंत्रणेप्रमाणे भाजपाचं काम, शरद पवारांचा मोंदीवर हल्लाबोल
  2. रश्मी शुक्लांचं कमबॅक; अखेर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या रामभूमीतून फोडणार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

ABOUT THE AUTHOR

...view details