पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण नवी दिल्ली :नवीन संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज 28 मे 2023 हा एक शुभ मुहूर्त आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. आज सकाळी संसद भवन संकुलात सर्वधर्मीय प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. या सुवर्ण क्षणासाठी मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. ही केवळ एक इमारत नाही, तर ती 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे.
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. या सुवर्ण क्षणासाठी मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. ही केवळ एक इमारत नाही, तर ती 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोकशाहीचे मंदिर - मोदी म्हणाले की, हे 140 कोटी भारतीय नागरिकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. आज संपूर्ण जग भारताकडे आदराने आणि आशेने पाहत आहे. जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा जग पुढे जाते, असे पंतप्रधान म्हणाले. ही केवळ इमारत नाही, तर ती 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. यातून भारताच्या निर्धाराचा संदेश जगाला मिळतो. हे इमारत आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता - नवीन संसद भवन हे वास्तवाशी नियोजन, बांधकामाशी धोरण, कृतीशी इच्छाशक्ती आणि यशाशी संकल्पना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ही नवीन इमारत एक नवीन माध्यम बनेल. ही नवीन इमारत स्वावलंबी भारताचा सूर्योदय पाहणार आहे. या नवीन इमारतीमुळे विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता होणार आहे. नव्या वाटांवर चालतानाच नवे आदर्श निर्माण होतात. आज नवा भारत नवीन ध्येय निश्चित करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
नवीन संसद भवनाचे उद्घाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते. 970 कोटी खर्चून बांधलेल्या नवीन संसद भवनाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. उद्घाटनापूर्वी, पंतप्रधानांनी संसद भवनाच्या बांधकामाशी संबंधित मजुरांना स्मृतिचिन्ह म्हणून पारंपरिक शाल देऊन त्यांचा सन्मान केला. नवीन संसद भवनात सर्व-धर्म प्रार्थनेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध धर्मांच्या पुजाऱ्यांनी पारंपारिक श्लोकांचे पठण केले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी पूजा केल्यानंतर, नवीन लोकसभेच्या चेंबरमध्ये, स्पीकरच्या खुर्चीजवळ पवित्र 'सेंगोल' (राजदंड) स्थापित केले. 'सेंगोल' हे अमृत कालचे प्रतिक म्हणून स्थापित केले गेले आहे. 'सेंगोल' बसवल्यानंतर पंतप्रधानांनी तामिळनाडूतील विविध अध्यामांतील संतांचे आशीर्वाद घेतले.
हेही वाचा -
- Sharad Pawar : उद्घाटनावेळी 'ती' कृती पाहून शरद पवार म्हणाले, कार्यक्रमाला न गेल्याचे समाधान...
- New Parliament Building : नव्या संसद भवनाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन, पाहा Photos
- New Parliament Inauguration: संसद भवन उद्घाटनादिवशीच दिल्ली परिसराच्या सीमा सील, नेमके कारण काय?