नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका आणि इजिप्त या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यासाठी कैरोलाही जाणार आहेत.
अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की न्यूयॉर्क शहर आणि वॉशिंग्टन डीसीमधील कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहे. या कार्यक्रमांमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमांचा समावेश होतो. जगन्नाथ यात्रेसाठी त्यांनी तमाम देशवासियांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
21 जून 2023-
- संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे.
22 जून 2023-
- व्हाईट हाऊसमध्ये औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे.
- अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक आणि भोजन घेणार आहेत.
- यूएस काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.
23 जून 2023
- अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत स्नेहभोजन करणार आहेत.
- भारतीय डायस्पोरा सदस्यांशी बैठक घेणार आहेत.
इजिप्तचाही करणार दौरा:परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 21 जून रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत . पंतप्रधान मोदी त्यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्याच्या समाप्तीनंतर इजिप्तला दौऱ्यासाठी रवाना होऊन 24 जूनला कैरोला पोहोचणार आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधानांना या वर्षी जानेवारीत आमच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला 'मुख्य पाहुणे' म्हणून हजेरी लावली. तेव्हा त्यांनी पंतप्रधानांना भेट देण्याचे आमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा असणार आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2009 मध्ये अमेरिकेचा केला दौरा: यापूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली आहे. मात्र, त्या बैठका शासकीय स्तरावरील नव्हत्या. पंतप्रधान मोदींची नऊ वर्षांतील ही पहिलीच अमेरिकेची अधिकृत भेट असणार आहे. राष्ट्रपती राधाकृष्णन यांनी 1963 मध्ये भारतातून अमेरिकेचा दौरा केला होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 2009 मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते.
हेही वाचा-
- PM Modi US Visit : भारतीय समुदायामध्ये प्रचंड उत्साह, आंतरराष्ट्रीय गायिका करेल सादरीकरण, होतील महत्वाचे करार
- PM Modi To Lead Yoga Session : जागतिक योग दिवस, पंतप्रधान मोदी २१ जूनला संयुक्त राष्ट्र महासभेत करणार योगा