कोच्चि (केरळ) -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवार (दि. 1 सप्टेंबर)पासून दोन दिवसीय केरळ दौऱ्यावर आहेत. त्यांनी केरळमध्ये पोहचल्यानंतर येथील भारतीय रेल्वे आणि कोची मेट्रोसह विविध प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आणि तीन रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. ( PM Modi In Kerala ) राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आज दुपारी 4 वाजता येथे आलेले पंतप्रधान कुरुपंथारा-कोट्टायम चिंगावनम सेक्शनला जोडणाऱ्या भारतीय रेल्वेच्या 27 किमी दुहेरी मार्गाचे उद्घाटन केले. 750 कोटी रुपये खर्चून ते पूर्ण झाले आहे.
फेज-1A चे उद्घाटन केले पंतप्रधानांनी 76 कोटी रुपये खर्चून कोल्लम-पुनालूर दरम्यानचा नवीन विद्युतीकरण केलेला विभाग राष्ट्राला समर्पित केला, जो नयनरम्य मार्गाने जलद आणि किफायतशीर वाहतुकीचा मार्ग म्हणून काम करण्यासोबतच पर्यावरण पर्यटनाला चालना देईल. याशिवाय त्यांनी कोट्टायम-एर्नाकुलम आणि कोल्लम-पुनालूर दरम्यानच्या विशेष रेल्वे सेवांनाही हिरवा झेंडा दाखवला. केरळमधील रेल्वे विकास प्रकल्पांपैकी, मोदींनी तीन रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली, ज्याची किंमत 1,059 कोटी रुपये आहे. याशिवाय मोदींनी कोची मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली आणि NN जंक्शन ते वडक्केकोट्टा हा पहिला विभाग असलेल्या फेज-1A चे उद्घाटन केले.