महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Project Tiger : देशातील वाघांची आकडेवारी आज होणार जाहीर, पंतप्रधान बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर - देशातील वाघांची संख्या किती आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या आठव्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटणार आहेत. देशातील वाघांची संख्या किती आहे, याची आकडेवारी पंतप्रधान मोदी जाहीर करणार आहेत.

PM Modi   Bandipur tiger reserve forest Project Tiger
PM Modi Bandipur tiger reserve forest Project Tiger

By

Published : Apr 9, 2023, 9:51 AM IST

Updated : Apr 9, 2023, 10:08 AM IST

बंगळुरू- प्रोजेक्ट टायगर'ला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा कर्नाटकचा दौरा होत आहे. पंतप्रधानांच्या या भेटीची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार पंतप्रधान शनिवारी संध्याकाळीच म्हैसूरला पोहोचले आहेत. पंतप्रधान सकाळीच बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात पोहोचतील असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता वाघांची संख्या जाहीर करणार आहेतद. पंतप्रधान आज 'व्याघ्र संवर्धनासाठी अमृत कालचे व्हिजन' देशासमोर मांडणार आहेत. यासोबतच इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्सचीही(IBCA) घोषणा करणार आहेत.

पंतप्रधान देणार हत्ती कॅम्पला भेट -विविध प्रजातींच्या प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन हे आयबीसीएचे उद्दिष्ट असणार आहे. बांदीपूर व्याघ्र प्रकल्प कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात आहे. पंतप्रधान या जिल्ह्याला लागून असलेल्या तामिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्ती कॅम्पलाही भेट देणार आहेत. तेथील माहुतांशीही बोलणार आहेत. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सध्या आचारसंहिता लागू आहे. विधानसभेसाठी 10 मे रोजी येथे मतदान होणार आहे.

वाघांच्या मृत्यूमध्ये मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक -राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार देशात दर 40 तासांनी एका वाघाचा मृत्यू होत आहे. गतवर्षी विविध राज्यांमध्ये 30 वाघांचा मृत्यू झाला. एनटीसीएच्या ताज्या अहवालानुसार, मध्य प्रदेशात वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत सर्वात वाईट आहे. यावर्षी जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत सर्वाधिक नऊ मृत्यू झाले आहेत. यानंतर वाघांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्या तिथे सात वाघांचा मृत्यू झाला आहे.

व्याघ्र संवर्धनाच्या बजेटमध्ये वाढ-कर्नाटक आणि राजस्थान वाघांच्या मृत्यूमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत एनटीसीएने जाहीर केलेली आकडेवारीने यापूर्वीच चिंता वाढली आहे. डायनासोरप्रमाणे भारतातील वाघही येत्या काही वर्षांत नामशेष होतील का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मोदी सरकारने 2022 मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे बजेटचे वाटप 185 कोटी रुपयांवरून 300 कोटी रुपये केले होते. त्याचवेळी उत्तराखंड सरकारही राज्यात व्याघ्र संवर्धनासाठी चार ते पाच कोटी रुपये खर्च करत आहे.

हेही वाचा-Project Tiger : पंतप्रधान जाहीर करणार अधिकृत वाघांची संख्या; महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर

Last Updated : Apr 9, 2023, 10:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details