हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) कोरोना लसीवर काम करणाऱ्या पुणे, गुजरात आणि हैदराबाद येथील कंपन्यांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी लस तयार करण्याच्या कामाचा आढावा घेतला. तसेच संशोधकांचा कामाची प्रशंसा करत त्यांची पाठ थोपटली. गुजरात राज्यातील झायडस कंपनी, पुण्यातीस सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीला मोदींनी भेट दिली. यावेळी त्यांनी लस विकासाची सर्व माहिती संशोधकांकडून जाणून घेतली. तसेच सरकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले.
पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला मोदींची भेट
पंतप्रधान मोदी विशेष विमानाने आज दुपारी चार वाजता पुणे विमानतळावर पोहचले. तेथून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीते गेले. सायरस पुनावाला, अदर पुनावाला आणि नताशा पुनावाला यांनी मोदींचे स्वागत केले. तसेच पुनावाला यांच्यासह कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोदींनी बैठक घेतली. अदर पुनावाला पंतप्रधान मोदींना कोरोनावर लस विकसीत करण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेत घेऊन गेले. कोरोना लस विकासाचे काम कसे सुरू आहे याची सविस्तर माहिती पुनावाला यांनी पंतप्रधानांना दिली. कंपनीच्या संशोधकांनीही मोदींशी संवाद साधत लस निर्मितीवर चर्चा केली. त्यानंतर सुमारे सहा वाजता मोदी पुणे विमानतळावर पोहचले. तेथून विशेष विमानाने पंतप्रधान मोदी दिल्लीकडे रवाना झाले.
झायडस बायोटेक कंपनीला भेट
गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात झायडस बायोटेक कंपनी आहे. ही कंपनी डीएनएवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करून स्वदेशी लस तयार करण्याचे प्रयत्न करत असून त्यात कंपनीला यशही येत आहे. झायडस कंपनीने कॅडीला या दुसऱ्या एका औषधनिर्मिती कंपनीशी सहकार्य करून संशोधन सुरू केले आहे. मोदींनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. लसीसंदर्भात सर्व माहिती मोदींनी घेतली. लस संशोधनात भारत सरकार फार्मा कंपन्यांना सहकार्य करत असल्याचे मोदी त्यावेळी म्हणाले. ट्विट करून मोदींनी त्यांच्या व्हॅक्सीन दौऱ्याची माहिती दिली.
हैदराबादेतील भारत बायोटेकला मोदींची भेट