लुंबिनी (नेपाळ) - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi visit Lumbini ) सोमवारी नेपाळच्या लुंबिनी येथे दाखल झाले. लुंबिनी हे गौतम बुद्धांचे जन्मस्थान आहे. त्याचबरोबर, पंतप्रधान मोदी ( PM Modi at Lumbini on Buddha Purnima ) हे नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्याशी चर्चाही करणार आहे. जलविद्युत, विकास आणि कनेक्टिव्हिटी यासह विविध क्षेत्रात ( PM Modi at Lumbini News ) द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी ही चर्चा होणार आहे. देऊबा यांच्या निमंत्रणावरून नेपाळात आलेले मोदी हे बुद्ध पौर्णिमेनिमित्त लुंबिनीला एक दिवसाची भेट देत आहेत.
हेही वाचा -Digital rape : डिजिटल बलात्कार प्रकरणात 80 वर्षीय वृद्धाला अटक, काय आहे डिजिटल रेप? जाणून घ्या..
2014 पासून पंतप्रधानांचा हा पाचवा नेपाळ दौरा आहे. उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथून भारतीय वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे येथे आगमन झाले. दक्षिण नेपाळच्या तेराई मैदानी भागात स्थित लुंबिनी हे बौद्ध धर्माच्या पवित्र स्थानांपैकी एक आहे, कारण गौतम बुद्धांचा जन्म येथे झाला होता. या भेटीदरम्यान त्यांनी पवित्र मायादेवी मंदिराला भेट दिली आणि पूजेत सहभाग घेतला. लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या बुद्ध जयंती उत्सवाला पंतप्रधान संबोधित करतील. पंतप्रधान मोदी हे लुंबिनी मठ क्षेत्रामध्ये बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या उभारणीच्या पायाभरणी समारंभातही सहभागी होतील. पंतप्रधान मोदी आणि देऊबा यांची लुंबिनी येथे द्विपक्षीय बैठकही होणार आहे.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, बैठकीदरम्यान दोन्ही देशांचे पंतप्रधान नेपाळ-भारत सहकार्य आणि परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. गेल्या महिन्यात देऊबा हे भारत भेटीवर आले असता त्यांच्याशी चांगली चर्चा झाली. त्यानंतर देऊबा यांना पुन्हा भेटण्यास उत्सुक आहोत, असे रविवारी एका निवेदनात मोदी म्हणाले होते. दोन्ही देश अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सामायिक समजूतदारपणा निर्माण करतील, असे ते म्हणाले होते.
हेही वाचा -Todays Gold and Silver Rates : जाणून घ्या, राज्यातील आजचे सोने आणि चांदीचे दर..