नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवार) तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. विविध विकासकामांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. कारिकर जिल्ह्यात मोदी एका नवनिर्मित महामार्गाचेही उद्घाटन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर - पंतप्रधान मोदी तामिळनाडू दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवार) तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
पंतप्रधान मोदी
पुद्दुचेरीतील कारिकल जिल्ह्यातील NH45-A या ५६ कि.मी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. सुमारे २ हजार ४२६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. याच जिल्ह्यात मोदी मेडिकल कॉलेजच्या इमारतीचीही पायाभरणी करणार आहेत. हा प्रकल्प सुमारे ४९१ कोटी रुपयांचा आहे. पुद्दुचेरीत एका बंदराच्या कामाचा शुभारंभही मोदींच्या हस्ते होणार आहे. एका सोलार ऊर्जा प्रकल्पाचेही उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत.
Last Updated : Feb 25, 2021, 7:24 AM IST