महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Modi in Goa LIVE UPDATE : गोवा मुक्ती दिन सोहळा.. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनेक विकास योजनांचे लोकार्पण - गोवा मुक्ती दिन सोहळ्यासाठी मोदी उपस्थित

modi
modi

By

Published : Dec 19, 2021, 3:29 PM IST

Updated : Dec 19, 2021, 5:36 PM IST

17:33 December 19

सुशासन व दरडोई उत्पन्नात गोवा अव्वल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत चांगले काम करत आहेत - मोदी

सुशासन, दरडोई उत्पन्न आणि इतर अनेक बाबतीत गोवा अव्वल आहे. गोव्याच्या सर्व पात्र लोकसंख्येला पहिल्या डोसचे शंभर टक्के कव्हरेज पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. आज मी म्हणू शकतो की प्रमोद सावंत गोव्याच्या विकासासाठी मोठ्या दृष्टीनं काम करत आहेत - पंतप्रधान मोदी

17:31 December 19

गोव्यातील लोक किती प्रामाणिक, प्रतिभावान आणि कष्टाळू आहेत, हे मनोहर पर्रीकरांनी दाखवून दिले - मोदी

गोव्यातील लोक किती प्रामाणिक, प्रतिभावान आणि कष्टाळू आहेत, हे मनोहर पर्रीकर यांच्या व्यक्तिरेखेतून देशाने पाहिले. शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही आपल्या राज्यासाठी, आपल्या लोकांप्रती एकनिष्ठ कसे राहू शकते हे आपण आपल्या जीवनातून दाखवले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

17:31 December 19

पंतप्रधान मोदींच्या हस्ते गोव्यात अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नूतनीकरण केलेले फोर्ट अगुआडा जेल म्युझियम, गोवा मेडिकल कॉलेजमधील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, न्यू साउथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि गोव्यातील दावरलिम, नवीलिम येथे गॅस-इन्सुलेटेड सबस्टेशन यासह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.

16:43 December 19

तेव्हा पोप म्हणाले तुम्ही मला दिलेली 'ही' सर्वात मोठी भेट आहे - मोदी

काही काळापूर्वी मी इटली आणि व्हॅटिकन सिटीला गेलो होतो. तिथे मला पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची संधीही मिळाली. मी त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले, ज्यावर पोप फ्रान्सिस म्हणाले, “तुम्ही मला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे” हे त्यांचे भारतातील विविधतेबद्दल, आपल्या तेजस्वी लोकशाहीबद्दलचे प्रेम आहे: पंतप्रधान मोदी

16:43 December 19

ना गोवा आपले भारतीयत्व विसरला आहे, ना भारत आपला गोवा -मोदी

गोवा पोर्तुगालच्या अधिपत्याखाली आला जेव्हा देशाच्या इतर मोठ्या भागावर मुघलांचे राज्य होते. पण शतकांनंतरही ना गोवा आपले भारतीयत्व विसरला आहे, ना भारत आपला गोवा विसरला आहे - पंतप्रधान मोदी

16:04 December 19

गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’ मधील सैनिकांचा मोदींच्या हस्ते सत्कार

गोव्यातील डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर गोवा मुक्ती दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’ मधील सैनिकांचा सत्कार केला.

15:19 December 19

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पणजीतील सेल परेड आणि फ्लायपास्टला हजेरी

गोवा मुक्ती दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पणजीतील सेल परेड आणि फ्लायपास्टला हजेरी लावली.

15:18 December 19

नरेंद्र मोदी यांच्याकडून हुतात्मा स्मारकावर श्रद्धांजली अर्पण.

गोवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझाद मैदान, पणजी येथील हुतात्मा स्मारकावर श्रद्धांजली अर्पण केली.

15:12 December 19

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पणजी विमानतळावर आगमन, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले स्वागत

पणजी- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पणजी विमानतळावर आगमन; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा ( Prime Minister Narendra Modi Goa Tour ) दौऱ्यावर आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम ( Dr. Shyama Prasad Mukherjee Stadium Goa ) येथे दुपारी तीन वाजता आयोजित गोवा मुक्ती दिनाच्या समारंभास ( Liberation of Goa ) ते उपस्थित राहतील. याठिकाणी पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’ ( Operation Vijay ) मधील योद्ध्यांचा सत्कार करणार आहे. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा मुक्त करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन विजय’च्या यशासाठी दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.

15:06 December 19

पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा मुक्ती दिन सोहळ्यात उपस्थित

पणजी- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा ( Prime Minister Narendra Modi Goa Tour ) दौऱ्यावर आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम ( Dr. Shyama Prasad Mukherjee Stadium Goa ) येथे दुपारी तीन वाजता आयोजित गोवा मुक्ती दिनाच्या समारंभास ( Liberation of Goa ) ते उपस्थित राहतील. याठिकाणी पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’ ( Operation Vijay ) मधील योद्ध्यांचा सत्कार करणार आहे. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा मुक्त करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन विजय’च्या यशासाठी दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.

Last Updated : Dec 19, 2021, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details