नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील परिसरात उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी टि्वट करून माहिती दिली आहे. सायंकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम होईल. वर्ष 2017 मध्ये कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विद्यापीठात पुतळा बसविण्यास मान्यता देण्यात आली होती.
पुतळा उभारण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. 2017 मध्ये झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत स्वामी विवेकानंदांचा पुतळा आवारात स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली होती. पुतळा 2019 मध्ये पूर्ण झाला, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी डॉ. मनोज कुमार यांनी सांगितले.
विवेकानंद यांचा पुतळा जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यापेक्षा उंच -
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची उंची माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यापेक्षा सुमारे साडेतीन फूट उंच आहे.