नवी दिल्ली- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारकडून प्रधान मंत्री किसान सम्मान निधीचा ( Pradhan Mantri Kisan Samman Nidhi ) दहावा हप्ता 1 जानेवारी 2022 ला शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार ( Prime Ministers Office ) 1 जानेवारीला केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांवरून अधिक रक्कम वितरित केली जाणार आहे. ही रक्कम 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना ( 10 crore beneficiary farmer families ) मिळणार आहे. ही माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
हेही वाचा-Kalichran Maharaj : कालीचरण महाराजांना अखेर बेड्या; छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सरकार आमने-सामने
पीएम-किसान योजनेअंतर्गत ( PM KISAN scheme ) वर्षभरात पात्र शेतकऱ्याला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2 हजार रुपये अशी दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. आजतागायत शेतकऱ्यांच्या खात्यावर 1.6 लाख कोटी रुपये ( Samman Rashi ) वितरित केल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारकडून 351 शेतकरी गट संस्थांना ( Farmer Producer Organizations ) 14 कोटी रुपयांहून अधिक निधी दिला जाणार आहे. त्याचा सुमारे 1.24 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-Anganwadi Workers Protest Goa CM House : अखेर मध्यरात्रीच्या सुमारास विरोधी पक्षनेत्यांच्या मध्यस्थीने अंगणवाडी सेविकांचे आंदोलन मागे
Mann Ki Baat : 'मन की बात'मधील महत्त्वाचे मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 डिसेंबरला मन की बातमधून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, एकमेंकाची साथ निभावत भारताने मोठ्या महामारीचा सामना केला आहे. वर्ष 2020 संपले असून वर्ष 2022 येत आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्व जण करत असून मनात काहीतरी संकल्प करत आहेत. देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रसार होत आहे. यावर आपले शास्त्रज्ञ काम करत आहेत. पण, प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी, कोरोना नियमांचे पालन करावे आणि स्वत:ला शिस्त लावावी.