नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएडा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन केले. हे विमानतळ पूर्ण झाल्यानंतर पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे उत्तर प्रदेश हे देशातील एकमेव राज्य ठरणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले, की हे देशातील पहिले शून्य उत्सर्जन करणारे विमानतळ असेल.
उत्तर प्रदेशसाठी महत्त्वाचे
पंतप्रधान मोदींनी नोएडा विमानतळाच्या (Noida International Airport) उद्घाटनासंदर्भात ट्विट केले आणि म्हटले, की जेवार विमानतळाची पायाभरणी हा उत्तर प्रदेश आणि भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक प्रसंग आहे.
हेही वाचा-Cryptocurrency संसदेच्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोचलनाच्या नियमनाकरिता विधेयक होणार सादर
एकमेव राज्य
याआधी मंगळवारी एका निवेदनात सांगण्यात आले होते, की पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर येथे आज (25 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजता नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. यासह उत्तर प्रदेश पाच आंतरराष्ट्रीय विमानतळअसलेले एकमेव राज्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
हेही वाचा-NFHS-5 : भारतातील जन्म दर होतोय कमी, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण प्रसिद्ध
भविष्यातील गरजांसाठी
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, भविष्यातील गरजांसाठी विमान वाहतूक क्षेत्राला तयार करण्याच्या आणि कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याचा पंतप्रधानांचा उद्देश आहे. त्यानुसार वाटचाल सुरू आहे. या दृष्टिकोनांतर्गत, उत्तर प्रदेशकडे विशेष लक्ष दिले गेले आहे, जिथे नुकतेच नवीन कुशीनगर विमानतळाचे उद्घाटन झाले आणि अयोध्येतील निर्माणाधीन आंतरराष्ट्रीय विमानतळासह इतर विमानतळ बांधले जात आहेत.
हेही वाचा-Ganja Seized In Hyderabad : उस्मानाबादला जाणारा 1820 किलो गांजा रचकोंडा पोलिसांनी पकडला
दिल्ली विमानतळाचा ताण होणार कमी
नोएडा येथे बांधले जाणारे विमानतळ हे दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल आणि यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांचा ताण कमी होईल. धोरणात्मक दृष्टिकोनातून, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वेगळे महत्त्व असेल आणि ते अलीगढ, आग्रा, फरीदाबाद आणि शेजारच्या भागांव्यतिरिक्त दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादच्या लोकांच्या गरजा पूर्ण करेल.