महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Rozgar Mela 2022: पंतप्रधान मोदी आज करणार 'पीएम रोजगार मेळावा 2022' चा शुभारंभ - Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज 22 ऑक्टोबर रोजी 'पीएम रोजगार मेळा 2022' लाँच करणार आहेत. (PM Rozgar Mela 2022). रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये किमान 10 लाख नोकऱ्यांसाठी मेगा भरती मोहीम राबविण्यात येणार आहे.

Narendra Modi
नरेंद्र मोदी

By

Published : Oct 22, 2022, 11:38 AM IST

नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज 22 ऑक्टोबर रोजी 'पीएम रोजगार मेळा 2022' लाँच करणार आहेत. (PM Rozgar Mela 2022). रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये किमान 10 लाख नोकऱ्यांसाठी मेगा भरती मोहीम राबविण्यात येणार आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाँच: पीएम रोजगार 2022 भरती योजना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू केली जाईल. याद्वारे सुमारे 75,000 उमेदवारांना विविध सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे मिळणार आहेत. यावेळी पंतप्रधान या नवनियुक्त जवानांना संबोधितही करतील. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या पंतप्रधानांच्या निरंतर वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असेल. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार, सर्व मंत्रालये आणि विभाग मिशन मोडमध्ये मंजूर पदांच्या विद्यमान रिक्त जागा भरण्याच्या दिशेने काम करत आहेत. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी भारत सरकारच्या 38 मंत्रालये/विभागांमध्ये नियुक्त केले जातील. नवीन भरती झालेले कर्मचारी गट-अ, गट-ब (राजपत्रित), गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क अशा विविध स्तरांवर सरकारमध्ये सामील होतील.

या पदांसाठी भरती: ज्या पदांसाठी भरती केली जात आहे त्यात केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, एमटीएस यांचा समावेश आहे. ही भरती मंत्रालये आणि विभाग मिशन मोडमध्ये स्वतःहून किंवा युपीएससी, एसएससी, रेल्वे भर्ती बोर्डांसारख्या भर्ती एजन्सींद्वारे होणार आहे. जलद भरतीसाठी, निवड प्रक्रिया सुलभ आणि तांत्रिकदृष्ट्या कार्यक्षम बनवण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details