महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

longest river cruise : पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचे उद्घाटन - रिव्हर क्रूझचे उद्घाटन

आलिशान MV गंगा विलास क्रूझ (MV Ganga Vilas) भारत आणि बांगलादेशातील पाच राज्यांमधील 27 नद्या पार करेल. ही क्रूझ 51 दिवसांत सुमारे 3,200 किमी जलमार्ग कव्हर करेल. (worlds longest river cruise). ही क्रूझ वाराणसी ते दिब्रुगड असा प्रवास करणार असल्याची माहिती आहे. हे जहाज १३ जानेवारीला निघून १ मार्चला गंतव्य स्थळी पोहोचेल. (PM Modi to inaugurate worlds longest river cruise).

river cruise
रिव्हर क्रूझ

By

Published : Jan 9, 2023, 5:27 PM IST

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारीला जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचे उद्घाटन करणार आहेत. (PM Modi to inaugurate worlds longest river cruise). पंतप्रधान वाराणसी येथून या रिव्हर क्रूझचे उद्घाटन करतील. 'MV गंगा विलास' (MV Ganga Vilas) असे या लक्झरी क्रूझचे नाव आहे. या क्रुझमुळे पर्यटन उद्योगाच्या दृष्टीने भारताच्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा रोवल्या जाईल, असे म्हटले जात आहे. (worlds longest river cruise).

3,200 किमी जलमार्ग कव्हर करेल : या प्रकल्पाचा उद्देश हा गंगा नदीतील पर्यटन सुधारणे हा आहे. जगातील सर्वात लांब नद्यांपैकी एक असलेल्या या नदीवरील समुद्रपर्यटन भारताला जगाच्या पर्यटन नकाशावर खूप वर घेऊन जाईल हे यात शंका नाही. आलिशान MV गंगा विलास भारत आणि बांगलादेशातील पाच राज्यांमधील 27 नद्या पार करेल. ही क्रूझ 51 दिवसांत सुमारे 3,200 किमी जलमार्ग कव्हर करेल.

जहाजाचा मार्ग : 51 दिवसांच्या दौऱ्यात ही क्रूझ 50 पर्यटन स्थळांना भेट देणार आहे. ही क्रूझ पाटणा, साहिबगंज, कोलकाता, ढाका आणि गुवाहाटीसह सर्व महत्त्वाचे नदी घाट, राष्ट्रीय उद्याने आणि जागतिक वारसा स्थळांवरून जाणार आहे. क्रूझचा प्रवास वाराणसी येथून सुरू होईल आणि उत्तर प्रदेशातील गाझीपूरमार्गे बिहार मध्ये पाटणा आणि नंतर कोलकाता येथे पोहोचेल. त्यानंतर बांगलादेशच्या नदीत प्रवेश केल्यानंतर, दिब्रुगढपर्यंत १५ दिवसांनी ती आसामच्या गुवाहाटी शहरात प्रवेश करेल. ६२ मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदी असलेल्या या लक्झरी क्रूझ जहाजात तीन डेक, १८ सूट असून त्यात ३६ लोक बसू शकतात. तसेच हे जहाज नदी किंवा पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे प्रदूषित करत नाही.

१ मार्चला गंतव्य स्थळ गाठणार : जहाजाच्या या पहिल्या प्रवासासाठी स्वित्झर्लंडमधून 32 जणांना आमंत्रित करण्यात आले असून ते वाराणसी ते दिब्रुगड असा प्रवास करणार असल्याची माहिती आहे. हे जहाज १३ जानेवारीला निघून १ मार्चला गंतव्य स्थळी पोहोचेल. देशवासीयांना तसेच परदेशी पर्यटकांना भारतातील नद्यांची माहिती देण्यासाठी या क्रूझची कल्पना आहे. भारताचे अंतर्देशीय जलमार्ग आणि बंदर प्राधिकरणाच्या संयुक्त पुढाकाराने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details