नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदीआज 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन करणार Pm Modi to Inaugurate Kartavya path आहेत. इंडिया गेट येथे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार Unveil Statue Of Netaji Subhash Chandra Bose आहेत. पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी एका निवेदनात ही माहिती दिली. नवी दिल्ली नगरपरिषदेने गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या ठरावाद्वारे 'राजपथ'चे नाव बदलून 'कर्तव्य पथ' केले आहे. आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतच्या संपूर्ण परिसराला 'कर्तव्य पथ' म्हटले जाईल.
पीएमओने म्हटले आहे, की पूर्वीचे 'राजपथ' हे सत्तेचे प्रतीक होते. त्याला 'कर्तव्य पथ' असे नाव देणे, हे बदलाचे लक्षण आहे. ते सार्वजनिक मालकी आणि सशक्तीकरणाचे देखील एक उदाहरण आहे. 'कर्तव्य पथ'चे उद्घाटन आणि सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण Pm Modi Unviel Statue हे पंतप्रधान मोदींच्या अमृत काळात नव्या भारतासाठी 'पंचप्राण' या दुसऱ्या व्रताच्या अनुषंगाने आहे, ज्यामध्ये त्यांनी वसाहतवादी मानसिकतेचे प्रत्येक लक्षण संपवण्याविषयी सांगितले.
मूलभूत सुविधांचा अभावामुळे राजपथचा पुनर्विकास राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूच्या आजूबाजूच्या भागातील गर्दीमुळे पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या दबावामुळे आणि सार्वजनिक शौचालये, पिण्याचे पाणी, पार्किंगसाठी पुरेशी तरतूद यासारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे राजपथचा पुनर्विकास करण्यात आला आहे. पीएमओने म्हटले आहे की, त्यांनी वास्तुशिल्पाचे वैशिष्ट्य आणि अखंडता राखण्याची देखील खात्री केली आहे. कर्तव्य पथ सुधारित सार्वजनिक जागा आणि सुविधा प्रदर्शित करेल, ज्यामध्ये पायवाट असलेले लॉन, हिरवीगार जागा, नूतनीकरण केलेले कालवे, रस्त्यांच्या कडेला सुधारित फलक, नवीन सुविधा ब्लॉक्स आणि विक्री स्टॉल यांचा समावेश आहे.