महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Appointment Letters : रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदी 71 हजार तरुणांना देणार नियुक्तीपत्रे - PM Modi in Rojgar Mela

पंतप्रधान आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना संबोधित करणार आहे. आज रोजगार मेळाव्यात ( PM Modi in Rojgar Mela ) 71,000 तरुणांना नियुक्तीपत्रे देणार आहेत. याआधी ऑक्टोबरमध्ये 'रोजगार मेळाव्या' अंतर्गत ७५,००० नव्याने भरती झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. ( Appointment Letters Under Rozgar Mela To 71000 Recruits )

Pm Modi
पीएम मोदी

By

Published : Nov 22, 2022, 9:46 AM IST

नवी दिल्ली : आज केंद्र सरकारतर्फे दुसऱ्या रोजगार मेळाव्याचे (PM Modi in Rojgar Mela) आयोजन करण्यात येणार आहे. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज 71 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देणार आहेत. पीएमओने ही माहिती दिली. यावेळी पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना संबोधित देखील करणार असल्याचे पीएमओने सांगितले. ( Appointment Letters Under Rozgar Mela To 71000 Recruits )

युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध :युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी रोजगार मेळा हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. पीएमओने सांगितले की रोजगार मेळा युवकांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासाच्या सहभागासाठी एक संधी देण्यात येत आहे. पंतप्रधानांनी ऑक्टोबर महिन्यात रोजगार मेळावा सुरू केला होता. तेव्हा पहिल्या टप्प्यात 75 हजार तरुणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याचे निर्देश :पंतप्रधान यावेळी नवनियुक्त कर्मचार्‍यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या 'कर्मयोगी प्रबंध' या ऑनलाइन अभ्यासक्रमाचे उद्घाटनही करतील. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणची नीतिमत्ता, मानव संसाधन धोरणे, भत्ते आणि इतर फायदे यांच्याशी संबंधित माहितीचा समावेश असेल, ज्यामुळे तरुणांना सरकारी धोरणांशी तसेच नव्या भूमिकेशी सहजपणे जुळवून घेण्यास मदत होईल. यावेळी नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर इतर अभ्यासक्रम शोधण्याची संधीही मिळेल. त्यासाठी एक वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना विविध पदांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याचे निर्देश दिले होते.

45 ठिकाणी नियुक्तीपत्रे देण्यात येणार :देशात 45 विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. शिक्षक, प्राध्यापक, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरा मेडिकल पदांवरही नियुक्ती केली जाणार आहे. पीएमओने सांगितले की, यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विविध केंद्रीय दलांमध्ये मोठ्या संख्येने तरुणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details