जैसलमेर -पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमध्ये जाऊन उत्सव साजरे करतात. आज, दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-पाक सीमेवर जैसलमेरला दाखल झाले आहेत. पंतप्रधान सीमेवर तैनात सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतील.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्र्यांसमवेत संरक्षण प्रमुख बिपिन रावत, लष्करप्रमुख एमएम नरवणे, बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थाना हे असतील. लोंगेवाला भागात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथेच पंतप्रधान मोदी जवानांसह दिवाळी साजरी करतील. सैनिकांची दिवाळी साजरी केल्यानंतर मोदी दुपारी 12 नंतर जैसलमेरहून दिल्लीला रवाना होतील.
विमानतळ कॅम्पसमध्येच सैनिकांना संबोधित करतील -
पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमानाने जैसलमेरमधील हवाई दल विमानतळावर पोहोचले आहेत. हवाई दलातील अधिकारी आणि सैनिक यांच्यासमवेत ते दिवाळी साजरी करतील. तसेच विमानतळ कॅम्पसमध्येच ते सैनिकांना संबोधित करतील.