महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mann Ki Baat : हा दिवस बापूंच्या विचारांची शिकवण देतो - पंतप्रधान मोदी - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद

Pm Narendra Modi
Pm Narendra Modi

By

Published : Jan 30, 2022, 11:37 AM IST

Updated : Jan 30, 2022, 2:32 PM IST

12:47 January 30

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) मन की बात ( Mann Ki Baat ) कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 30 जानेवारी हा दिवस बापूंच्या विचारांची शिकवण देतो, असे ( Pm Modi On Mahatma Gandhi ) म्हटले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) मन की बात ( Mann Ki Baat ) कार्यक्रमाच्या माध्यमातून महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातील जनतेशी 11 वाजता संवाद साधतात. मात्र, आज त्यांनी 11.30 वाजता जनतेला संबोधित केले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त त्यांनी अभिवादन केलं. तसेच, 30 जानेवारी हा दिवस बापूंच्या विचारांची शिकवण देतो, असे पंतप्रधान मोदी यांनी ( Pm Modi On Mahatma Gandhi ) सांगितले.

मन की बात मध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आज महात्मा गांधी म्हणजे बापूंची पुण्यतिथी आहे. 30 जानेवारी हा दिवस बापूंच्या विचारांची शिकवण देतो. आता आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. यावेळी राजपथावर झालेल्या चित्ररथाच्या रॅलीत आपल्या देशाचे शौर्य आणि सामर्थ्य दिसून आले. इंडिया गेटजवळ ‘अमर जवान ज्योति’ आणि जवळच असलेल्या 'नॅशनल मेमोरिअल वॉर' मधील प्रज्ज्वलित ज्योतींचे विलनीकरण करण्यात आले आहे. यामुळे अनेक देशवासीयांच्या आणि शहीद कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू आले. इंडिया गेटवर नेताजींचा डिजिटल पुतळा बसवण्यात आला आहे," असेही त्यांनी सांगितले.

"अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये देशातील अनेकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. यातील एक म्हणजे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार. लहान वयात धाडसी आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या मुलांना हा पुरस्कार देण्यात आला. तसेच, देशात नुकतेच पद्म पुरस्कार जाहीर झाले. पद्म पुरस्कार मिळणाऱ्यापैकी अशी काही नावे आहेत, ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हे आपल्या देशातील पडद्या मागील हिरो आहेत, ज्यांनी कठीण परिस्थितीत असामान्य गोष्टी केल्याचेही," पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

त्याची झलक कॉलरवाली' वाघिणीच्या....

प्रत्येक सजीवासाठी सहानुभूती ही आपल्या संस्कृतीत आणि जन्मजात स्वभावात आहे. त्याची झलक 'कॉलरवाली' वाघिणीच्या अंतिम संस्कारात दिसली. मध्य प्रदेशमध्ये आदराने व आपुलकीने तिच्यावर आदराने व आपुलकीने ते अंत संस्कार पार पडले, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

11:57 January 30

उत्तराखंडच्या बसंतीदेवीचा दिला संदर्भ

मन की बात वेळी पंतप्रधानमंत्री मोदी म्हणाले की, जे कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता शांतपणे आपले काम करत राहिले त्यात पद्मश्रीने सन्मानित झालेल्या उत्तराखंडच्या बसंती देवी यांचा समावेश आहे. बसंतीदेवींनी त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षातच व्यतीत केले. लहान वयातच पतीचे निधन झाल्याने त्या आश्रमात राहू लागल्या. येथे राहून त्यांनी नदी वाचवण्यासाठी लढा दिला आणि पर्यावरणासाठी अतुलनीय योगदान दिले. महिला सक्षमीकरणासाठीही त्यांनी खूप काम केले आहे.

11:49 January 30

राष्ट्रीय वॉर मेमोरियल भेट द्यावी, पंतप्रधानांचे आवाहन

अमर जवान ज्योती ही शहीदांना एक मोठी श्रद्धांजली आहे. मी देशवासीयांना आवाहन करतो की त्यांनी राष्ट्रीय वॉर मेमोरियल भेट द्यावी. आझादी का अमृत महोत्सव निमित्त बाल पुरस्कार आणि पद्म पुरस्कार जाहीर झाले.

11:45 January 30

शहीद कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू

इंडिया गेटजवळील 'अमर जवान ज्योती' आणि नॅशनल वॉर मेमोरिअल मधील ज्योती यांना एकत्र केल्याने अनेक देशवासीय आणि शहीद कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू आले होते

11:40 January 30

कोट्यवधी विद्यार्थांचे पंतप्रधांनांना पत्र

एक कोटीहून अधिक विद्यार्थांनी मला पत्र पाठवून 'मन की बात' केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

11:37 January 30

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती पासून सुरुवात होत असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी पर्यंत साजरा केला जाणार आहे.

11:25 January 30

Live : 'मन की बात' कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद

'मन की बात' कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद

Last Updated : Jan 30, 2022, 2:32 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details