महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी आज 'मन की बात' मधून देशवासीयांना संबोधणार - मन की बात कार्यक्रम

पंतप्रधान मोदी आज (रविवार) सकाळी ११ वाजता 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करणार आहेत. या वर्षातील हा दुसरा कार्यक्रम आहे. ट्विटरवरून मोदींनी ही माहिती दिली.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

By

Published : Feb 28, 2021, 7:41 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी आज (रविवार) सकाळी ११ वाजता 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करणार आहेत. या वर्षातील हा दुसरा कार्यक्रम आहे. ट्विटरवरून मोदींनी ही माहिती दिली.

कला संस्कृती, पर्यटन, कृषीवर चर्चा -

कला, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम केलेल्या नागरिकांची प्रेरणादायी उदाहरणे पुढे आणण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना १५ फेब्रुवारीला केले होते. कला, संस्कृती, पर्यटन, कृषी क्षेत्रातील नाविन्य अशा अनेक विषयांवर जानेवारी महिन्यातील मन की बातमध्ये मोदींनी चर्चा केली. पुढील मन की बात कार्यक्रमात बोलण्यासाठी आणखी प्रेरणादायी उदाहरणे सांगण्याचे आवाहन मोदींनी नागरिकांना केले होते.

जानेवारीतील मन की बात -

याआधी जानेवारी महिन्यात मन की बात कार्यक्रम झाला होता. त्यात पंतप्रधानांनी 26 जानेवारीला शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराविषयी टिप्पणी केली होती. कृषी कायद्यांचा निषेध करणार्‍या शेतकऱ्यांनी पूर्वनियोजित मार्गाचा अवलंब केला नाही आणि दिल्लीत प्रवेश करण्यासाठी त्यांनी बॅरिकेड्स तोडले. त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली आणि मालमत्तेची तोडफोड केली गेली. त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि त्याचे झेंडे त्याच्या तटबंदीवरून फडकावले. या पार्श्वभूमीवर 'तिरंग्याचा अपमान पाहून संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details