टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) मध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) 87.58 मीटर भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं आहे. या मेडलसोबत ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे. आज संपूर्ण देश नीरज चोप्रा (Neeraj Chopra Gold Medal) ने सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल जल्लोष करत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (pm modi telephonic conversation neeraj chopra) नीरज चोप्राला फोन करुन त्याचे अभिनंदन केले आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला फोन लावत पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सोबतच असेही म्हणाले की, तु गोल्ड जिंकले म्हणून संपूर्ण देश आनंद व्यक्त करत आहे. पानीपतने पाणी दाखवून दिलं तू.. हे सर्व तुझ्या मेहनतीचं फळ आहे. तु देशाचं नाव केलं आहेस. तुझ्यामुळे तरुणांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळेल. टोक्योत आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. तू तर एक सैनिक आहेस, आणखी मुलांना घडवशील यात शंका नाही. तसेच तसेच १५ ऑगस्टला आपण भेटतोय, असेही मोदी म्हणाले.