महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Modi Telangana Visit : विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर; 13500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण

PM Modi Telangana Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर तेलंगणाला भेट देणार आहेत. यादरम्यान ते 13500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी तसंच लोकार्पण करणार आहेत.

PM Modi Telangana Visit
PM Modi Telangana Visit

By ANI

Published : Oct 1, 2023, 10:31 AM IST

हैदराबाद PM Modi Telangana Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी तेलंगणाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते 13,500 कोटींच्या अनेक विकासात्मक प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. आज दुपारी 2.15 वाजता पंतप्रधान महबूबनगर जिल्ह्यात पोहोचतील. तिथे रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रातील 13,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची ते पायाभरणी तसंच लोकार्पण करणार आहेत.

अनेक रस्ते महामार्गांच भुमीपूजन : या दौऱ्यात पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काचीगुडा ते रायचूर रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. तसंच पीएम मोदी नागपूर-विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग असलेल्या प्रमुख रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पांमध्ये वारंगल ते खम्मम विभागापर्यंतचा 108 किमी लांबीचा चौपदरी महामार्ग आणि खम्मम ते विजयवाडा या 90 किमी लांबीच्या महामार्गाचा समावेश आहे. हे प्रकल्प एकूण 6400 कोटी रुपये खर्चून विकसित केले जाणार आहेत.

भारतमाला प्रकल्पांतर्गत प्रकल्प विकसित-प्रकल्पांमुळे वारंगल आणि खम्मममधील प्रवासाचं अंतर सुमारे 14 किमीनं कमी होईल. खम्मम आणि विजयवाडा दरम्यानचं अंतर सुमारे 27 किलोमीटरनं कमी होणार आहे. यासोबत सूर्यापेट ते खम्मम हा ५९ किमी लांबीचा चार लेन रस्ता प्रकल्प (NH-365BB) अंदाजे 2,460 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. पंतप्रधान यावेळी एका रस्त्याचा प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करतील, असं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं हा प्रकल्प हैदराबाद-विशाखापट्टणम कॉरिडॉरचा भाग आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत विकसित केला जाईल. यामुळं खम्मम जिल्हा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागांना देखील चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान होईल, असं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे.

जैकलेयर-कृष्णा नव्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण :प्रकल्पादरम्यान, पंतप्रधान जैकलेयर-कृष्णा नव्या ३७ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण करतील. 500 कोटींहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेला हा नवीन रेल्वे मार्ग नारायणपेठ या मागास जिल्ह्याचा भाग प्रथमच रेल्वेच्या नकाशावर आणणार आहे. तसंच हैदराबाद (काचीगुडा) – रायचूर – हैदराबाद (काचीगुडा) ट्रेन सेवेलाही पंतप्रधान हिरवी झेंडा दाखणार आहेत. रेल्वेमुळे तेलंगणातील हैदराबाद, रंगारेड्डी, महबूबनगर, नारायणपेठ या जिल्ह्यांना कर्नाटकातील रायचूर जिल्हा जोडला जाणार आहे. .

  • दोन दिवसांनी पंतप्रधान निजामाबाद दौऱ्यावर :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणातील महबूबनगर दौऱ्यावर आहेत. यानंतर ते 3 ऑक्टोबरला निजामाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या दौऱ्यात ते निजामाबादमध्ये 8021 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण तसंच उद्घाटन करणार आहेत.

हेही वाचा :

  1. Parliament Special Session : रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारा गरीब मुलगा संसदेत पोहोचला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. Vande Bharat Train : देशातील 11 राज्यांना गिफ्ट! पंतप्रधान मोदींच्या हस्ते नऊ वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण
  3. Ashwini Vaishnav On Railway Project : मंत्रिमंडळाची 7 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्रातील मुदखेड ते मेडचल प्रकल्पाचा समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details