नली दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून गुजरातमधील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या ४८ तासांत विशेषतः दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसाची आणि परिणामी परिस्थितीची माहिती दिली आहे.
PM Modi talked to Gujarat CM : पंतप्रधानांचा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन; पूर परिस्थितीची केली चौकशी - पंतप्रधानांचा गुजराच्या मुख्यंत्र्यांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून गुजरातमधील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या ४८ तासांत विशेषतः दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसाची आणि परिणामी परिस्थितीची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी याबाबत ट्विट केले आहे - पावसाळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार एनडीआरएफच्या सहकार्याने राज्यातील पाऊसग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी याबाबत ट्विट केले आहे. दरम्यान, गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अहमदाबादसह दक्षिण आणि मध्य गुजरातमधील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
हेही वाचा -Sonia Gandhi: सोनिया गांधींना ईडीकडून पुन्हा नोटीस; 21 जुलै'ला चौकशीसाठी हजर राहणार