महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Delhi Flood: विदेशातून परताच पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर; दिल्लीतील पुरासंबंधी केली उपराज्यपालांशी चर्चा - दिल्ली पूरस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय फ्रान्सचा दौरा आणि संयुक्त अरब अमिरातीचा एक दिवसाचा दौरा करुन भारतात परतले आहेत. दिल्लीला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याशी पुरासंदर्भात चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी उपराज्यपाल यांच्याशी फोनवर संपर्क साधून पूर परिस्थितीची माहिती जाणून घेतली.

दिल्लीतील पुरासंबंधी पंतप्रधान मोदींची उपराज्यपालांशी चर्चा
दिल्लीतील पुरासंबंधी पंतप्रधान मोदींची उपराज्यपालांशी चर्चा

By

Published : Jul 16, 2023, 7:36 AM IST

नवी दिल्ली: विदेशाचा दौरा पूर्ण करुन परत भारतात परतल्यानंतर पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर कामाला लागले आहेत. पंतप्रधान मोदी शनिवारी सायंकाळी दिल्लीला पोहोचले. दिल्लीला पोहोचताच मोदींनी उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पंतप्रधान मोदींनी उपराज्यपालांकडून दिल्लीतील पूरस्थितीविषयी माहिती जाणून घेतली.

उपराज्यपालशी फोनवर चर्चा : मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांना दिल्लीत पुरापासून वाचविण्यासाठी आणि पुरापासून संरक्षण होण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. अनेक संस्था आणि सरकारकडून विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. कोणकोणत्या सरकारी यंत्रणाकडून करण्यात आल्या याची माहिती पंतप्रधान मोदींनी उपराज्यपाल सक्सेना यांच्याकडून घेतली. गेल्या गुरुवारी पंतप्रधान फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना त्यांनी फ्रान्समधून उपराज्यपालांशी फोनवरून चर्चा केली. दिल्लीतील परिस्थितीबद्दल चर्चा केली होती. त्यानंतर उपराज्यपालांनी त्याची माहिती ट्विटरवर शेअर केली होती. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत घेऊन दिल्लीच्या हितासाठी योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

पूरग्रस्त भागात पाहणी : दिल्लीतील पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नायब राज्यपालही मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह उपराज्यपालांनी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. उपराज्यपाल शनिवारी लाल किल्ला, कश्मीरी गेट, राजघाट, अशा पूरबाधित भागात गेले होते. राज्यपाल यांनी तेथील बचाव कार्य आणि पाणी बाहेर काढण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली. नायब राज्यपालांनी राज निवास येथे पूर नियंत्रणाबाबत दिल्ली सरकारचे मुख्य सचिव, महसूल विभागाचे सचिव यांची बैठक घेतली आणि पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मदत कार्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले. पुराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत रविवारपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच अन्य राज्यांतून दिल्लीत येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील यमुनेची पाणी पातळी शनिवारी रात्री 206.35 मीटरच्या आसपास स्थिर आहे. एनडीआरएफच्या 18 टीम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत.

हेही वाचा -

  1. weather forecast update today : हिमाचल, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, केरळमध्ये आतापर्यंत 10 हजार नागरिक विस्थापित
  2. Delhi Flood : 'कृपा करून तुम्ही हस्तक्षेप करा, नाहीतर..', दिल्लीतील पूरपरिस्थितीवर केजरीवालांचे अमित शाह यांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details