नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर पुन्हा एकदा हल्ला (Pm modi slams congress ) चढवला. प्रतिष्ठित दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांना (Hridaynath Mangeshkar fired from AIR) ऑल इंडिया रेडिओवरून काढून टाकल्याचा उल्लेख करत काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
"लता मंगेशकरजींच्या निधनामुळे आज भारत दु:खी आहे. गोव्यात काँग्रेसच्या राजवटीत, त्यांचे धाकटे भाऊ, हृदयनाथ मंगेशकरांनी वीर सावरकरांची कविता गायल्याने त्यांना आठ दिवसांत ऑल इंडिया रेडिओवरून काढून टाकण्यात आले होते. असेही नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी मंगेशकरांचा विधानसभेच्या निवडणुकीत मत देणारा "गोव्याचा अभिमानी पुत्र" असाही उल्लेख केला. आकाशवाणीवर वीर सावरकरांची देशभक्तीपर कविता एकदाच सादर केली होती. एवढात काय त्यांचा दोष होता? असेही पंतप्रधानांनी म्हटले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची संकल्पना
हृदयनाथजींनी एका मुलाखतीत सांगितले होते की ते एकदा सावरकरांना भेटले होते. सावकरकर मंगेशकरांना म्हणाले 'तुला माझी कविता ऐकवल्याबद्दल तुरुंगात जायचे आहे का?' हृदयनाथजींनी ती कविता गायली. आणि आठ दिवसांतच त्यांची हकालपट्टी झाली. हीच त्यांची काँग्रेस अभिव्यक्ती स्वातंत्र्याची संकल्पना होती,” असेही त्यांनी सांगितले.
मजरूह सुलतानपुरी, आणि किशोर कुमारचाही उल्लेख
या प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचाही उल्लेख केला. त्यांना 1949 मध्ये दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर टीका केल्याबद्दल तुरुंगात पाठवण्यात आले होते. पीएम मोदींनी प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्याबद्दल सांगताना आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना नमन न केल्याने रेडिओवर गाण्यास बंदी घातली होती. कॉंग्रेसने घराणेशाहीच्या पलीकडे कधीच विचार केला नाही. लोकशाहीला सर्वात मोठा धोका हा घराणेशाही पक्षांचा आहे. आणि जेव्हा कुटुंब सर्वोत्कृष्ट होते, तेव्हा पहिला अपघात प्रतिभेचा होतो." असेही नमूद केले. "प्रतिभा ही घराणेशाहीच्या राजकारणाची पहिली दुर्घटना आहे" आणि "काँग्रेस नसती तर" देश कसा वेगळा असता याची यादी सांगितली. लोकांना आश्चर्य वाटते की काँग्रेस नसती तर काय होते. ते भारत इंदिरा गांधी मध्ये अडकला असता" असेही विधान केले.
हेही वाचा -Hijab Controversy In Karnataka : कर्नाटकात महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदी.. मुस्लिम मुलींची याचिका, ३ दिवस हायस्कुल- कॉलेजेस बंद