नवी दिल्ली - पंजाब दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी (PM Security Breach) आज (10 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लॉयर्स व्हॉईस नावाच्या संघटनेने (organization called Lawyers Voice) दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
- मागील सुनावणीत न्यायालयात काय घडलं?
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजादरम्यान वरिष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मांडले होते. सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. खटल्याशी संबंधित सर्व रेकॉर्ड भटिंडाच्या जिल्हा न्यायाधीशांकडे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश द्यावेत, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत माहिती घ्यावी आणि या सुरक्षा त्रुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पंजाब सरकारला द्यावेत, अशी मागणी मनिंदर सिंह यांनी केली. यानंतर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हे सर्व रेकोर्ड सुरक्षित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यावर आज पुन्हा सुनावणी होत आहे.
- काय आहे प्रकरण?