महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Narendra Modi praised Mithali : मिताली अनेक खेळाडूंसाठी प्रेरणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मिताली राजने या महिन्याच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी पदार्पण करणारी मिताली तिच्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक सामना खेळणारी आणि सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मिताली राजचे कौतुक ( PM Narendra Modi praised Mithali ) केले.

PM Narendra Modi praised Mithali
PM Narendra Modi praised Mithali

By

Published : Jun 26, 2022, 10:55 PM IST

Updated : Jun 27, 2022, 6:07 AM IST

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मिताली राजचे कौतुक ( PM Narendra Modi praised Mithali ) केले. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या माजी भारतीय कर्णधाराला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. मितालीने वयाच्या सोळाव्या वर्षी पदार्पण केले होते.

मितालीने तिच्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक सामना खेळणारी आणि सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. तसेच ती सर्वात यशस्वी महिला कर्णधारही होती. मोदींनी रविवारी 'मन की बात'वर मितालीला भारतातील सर्वात प्रतिभावान क्रिकेटपटूंपैकी एक म्हटले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा अनेक क्रीडाप्रेमींवर भावनिक परिणाम झाला. मिताली केवळ एक असामान्य खेळाडूच नाही, तर अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. मी मितालीला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

26 जून 1999 रोजी आयर्लंडविरुद्ध पदार्पण केल्यानंतर मितालीने 12 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. मितालीने 333 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 10 हजार 868 धावा केल्या आहेत. त्याने 155 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले ज्यात संघाने विक्रमी 89 विजय नोंदवले. या यादीत बेलिंडा क्लार्क 83 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा -Ranji Trophy 2021-22 Final : रणजी स्पर्धेला मिळाला नवा चॅम्पियन; रणजी करंडकवर मध्य प्रदेशने प्रथमच कोरले नाव

Last Updated : Jun 27, 2022, 6:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details