नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये त्यांनी देशातील ऑक्सिजन पुरवठा आणि औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. यावेळी कोविड सोबतच सध्या प्रशासन म्युकरमायकोसिस बाबत करत असलेल्या नियोजनाबाबतही माहिती घेण्यात आली.
यानंतर पंतप्रधानांच्या कार्यालयाने या बैठकीबाबत माहिती दिली. नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितले, की ते सातत्याने ऑक्सिजन आणि औषध उत्पादकांच्या संपर्कात आहेत. सध्या घेण्यात येत असलेले उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, रेमडेसिवीरसह इतर आवश्यक औषधांचे उत्पादन वाढवण्यात आले असून; राज्यांना मुबलक प्रमाणात औषध पुरवठा करण्यात आल्याचे या बैठकीत पंतप्रधानांना सांगण्यात आले.