नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात शक्तिशाली नेते आहेत. नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढतच चालली आहे. यंदाही त्यांच्या लोकप्रियतेला चार चाँद लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशातच नाही, तर परदेशातही सर्वाधिक आहे. अप्रुव्हल रेटिंग एजन्सीच्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. जगातील अनेक बड्या नेत्यांना मोदींनी मागे टाकलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्लोबल लीडर ट्रॅकरमध्ये पीएम मोदींना सर्वाधिक 70 टक्के रेटिंग मिळाले आहे. सर्वेक्षणात मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर (66%) दुसऱ्या क्रमांकावर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी (58%) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जर्मन चांसलर अँजेला मर्केल (54%) तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (44%) सहाव्या स्थानावर आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे ४३ टक्के रेटिंगसह 7व्या क्रमांकावर आहेत. दक्षिण कोरियाचे नेते मून जे-इन 9व्या क्रमांकावर आहेत.