केवडिया: सरदार पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे आदरांजली वाहिली. यासोबतच त्यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथ दिली आणि परेडची सलामीही घेतली. त्याचवेळी गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांना वाहिली आदरांजली
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. यावेळी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना ( PM Modi pays tribute ) हजेरी लावली.
31 ऑक्टोबर रोजी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती देशभरात साजरी होत आहे. हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये आहेत, तर देशाचे गृहमंत्री अमित शाह दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचा हा गुजरात दौरा दोन दिवसांचा आहे. 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला गुजरातमध्ये मुक्काम करणार आहे.
पंतप्रधान प्रथम वडोदरा येथील कुष्ठरोग मैदानावर पोहोचले, जिथे त्यांनी भारतीय हवाई दलाच्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची पायाभरणी केली.