महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे दिले निमंत्रण - जी 20 परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकनमध्ये भेट घेतली. ही भेट 20 मिनिटे नियोजित होती. मात्र एक तासभर चालली. दोघांमध्ये वातावरणातील बदल आणि गरिबीचे उच्चाटन आदी विषयांवर चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोप फ्रान्सिस  भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोप फ्रान्सिस भेट

By

Published : Oct 30, 2021, 10:35 PM IST

रोम(इटली)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पोप फ्रान्सिस यांची व्हॅटीकनमध्ये भेट घेतली. सुत्राच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 1999 मध्ये व्हॅटिकनच्या पोप जॉन पॉल II यांनी भारताला भेट दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकनमध्ये भेट घेतली. ही भेट 20 मिनिटे नियोजित होती. मात्र एक तासभर चालली. दोघांमध्ये वातावरणातील बदल आणि गरिबीचे उच्चाटन आदी विषयांवर चर्चा झाली. या भेटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.

हेही वाचा-नोटबंदी, जीएसटीने नागरिक हैराण - राहुल गांधींची टीका

जी20 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी रोमन कॅथोलिक चर्चच्या प्रमुखांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे.

हेही वाचा-थायलंडचे दरवाजे बंद झाल्याने राहुल गांधी पर्यटनासाठी गोव्यात- तेजस्वी सुर्यांचा टोला

केरळ कॅथोलिक बिशप परिषदेकडून पोप-पंतप्रधान भेटीचे स्वागत-

केरळ कॅथोलिक बिशप परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्या रोममधील भेटीचे स्वागत केले आहे. पोप यांना भारतामध्ये आमंत्रित करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे कॅथोलिक बिशप परिषदेने म्हटले आहे. केरळ कॅथोलिक बिशप परिषदेने म्हटले आहे, की पोप फ्रान्सिस यांना भारतात निमंत्रित करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. जगात भारताचा मान वाढणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमध्ये रणनीतीचे संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. लवकरच पोप भारताच्या दौऱ्यावर येतील, अशी अपेक्षा आहे. पोप यांच्या दौऱ्यामुळे विविधता असलेल्या भारतात बंधूभाव आणि सहकार्याची भावना अधिक मजबूत होईल, असेही केरळ कॅथोलिक बिशप परिषदेने म्हटले आहे.

हेही वाचा-जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ स्फोट; सैन्यदलाच्या अधिकाऱ्यासह जवानाला वीरमरण

ABOUT THE AUTHOR

...view details