नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नसली, तरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच हा दौरा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
वर्षाच्या अखेरीस पंतप्रधान मोदी अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ब्रिटेन येथे होणाऱ्या जी-७ देशांच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी पंतप्रधान मोदी जाणार नाही, अशी माहिती विदेश मंत्रालयाकडून देण्यात आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 व 13 जून रोजी जी-७ देशांच्या शिखर संमेलनात डिजीटल माध्यमातून सहभाग घेतला होता. या जी-७ देशांमध्ये ब्रिटेन, कनाडा, फ्रांस, जर्मनी, इटली, जापान आणि अमेरिका या देशांचा समावेश होतो. यावेळी ब्रिटन या संमेलनाच्या अध्यक्षपदी असल्याने ब्रिटनने भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया और दक्षिण अफ्रीका या देशांना आमंत्रित केले होते.