महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी एकदिवसीय काश्मिर दौऱ्यावर जाणार - पंतप्रधान मोदी काश्मीर दौरा

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेणार आहेत. तसेच केंद्रशासित प्रदेशातील विकास कामे आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहे.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

By

Published : Feb 23, 2021, 7:03 AM IST

श्रीनगर -पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ किंवा २६ फेब्रुवारीला एक दिवसीय काश्मिर दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची पंतप्रधान भेट घेणार आहेत. तसेच केंद्रशासित प्रदेशातील विकास कामे आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहे.

साडेआठ कि.मी बोगद्याचे उद्घाटन -

पंतप्रधान मोदी

गाझिगुंड ते बनिहालला जोडणाऱ्या साडेआठ कि.मीच्या बोगद्याचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी करण्याची शक्यता आहे. हा बोगदा पूर्ण करण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंतच अवधी जम्मू काश्मीर प्रशासनाने केंद्र सरकारकडे मागितला होता.

अशांत काश्मीर -

५ ऑगस्ट २०१९ ला केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली. लडाख आणि जम्मू काश्मीर असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आली. तेव्हापासून काश्मिरात अशांत वातावरण आहे. दहशतवादी कारवाया वाढल्या असून स्थानिक तरुणांचाही या कारवायांमध्ये सहभाग वाढत आहे. मागील अनेक महिने इंटरनेट सेवेवर बंधने होती. ती आता उठवण्यात आली आहेत. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक मुख्य प्रवाहातील नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details